शरीराला स्फूर्ती, त्वचेला चमक देणारे संत्रे.
संत्र्यामध्ये व्हीट्यामीन ए, फोलिक अम्ल, क्यॅल्शियम , लोह, प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच गंधक इत्यादिसुद्धा भरपूर मात्रेत आढळतात.
संत्र्याचे काही औषधी उपयोग पाहूया.
संत्र्याच्या मोसमामध्ये याचे नियमित सेवन करीत राहण्याने लठ्ठपणा कमी होतो. आणि डाएटिंग न करता संत्र्याच्या मदतीने वजन कमी करता येते.
संत्र्याने त्वचेमध्ये निखार येतो व चेहरयाची कांती वाढते. संत्र्याच्या नियमित सेवनाने मुळव्याधीच्या आजारात लाभ होतो. यामध्ये रक्तस्त्राव रोखण्याची अदभुत क्षमता असते.
हृदय्रोग्यास संत्र्याचा रस मध मिसळून देण्याने आश्चर्यजनक लाभ होतो. संत्र्याचा एक ग्लास रस घेण्याने तन-मन यास शीतलता मिळते.
तसेच थकवा आणि तणाव दूर होतो. लघवीला जळजळ होत असल्यास संत्र्याचे सेवन केल्याने लाभ होतो.
मुलांना जन्माच्या काही दिवसानंतर दररोज दोन चमचे संत्र्याचा रस अवश्य द्यावा. याने मुलांची बुद्धी आणि बल यामध्ये वृद्धी होते. याचबरोबर त्यांची पचनक्रिया चांगली राहाते.
संत्र्याची साल चेहरयावर रगडल्याने सौदर्यात वाढ होते. त्वचेमध्ये निखर येतो व मुरूम, पुटकुळ्या आणि सुरकुत्या दूर होतात.