हिरव्या भाज्या खा निरोगी राहा
आजकाल सर्व चिकिस्तक हिरव्या पालेभाज्या सेवन करण्याचा सल्ला देतात. आयुर्वेद जगतामध्येसुद्धा हिरव्या भाज्यांचे अत्याधिक महत्त्व सांगितलेले गेले आहे.
पालेभाज्या खाणाऱ्या व्यक्तींना सामान्य आजारांबरोबरच कन्सरसारखे आजार होण्याची शक्यता नसते. भाज्यांमध्ये कित्येक अशी तत्वं आढळतात, जी मांस आणि मासे यातूनही मिळत नाहीत.
भाज्यांचा योग्य उपयोग करून शरीर स्वस्थ आणि निरोगी राखले जाऊ शकते. डोळ्यांची खराबी. अपचन आणि आतड्यांचे रोग यामध्ये वैद्य आणि डॉक्टर हिरव्या भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
भाज्यांमध्ये खनिज, क्षार आणि प्रोटीन टर आढळतातच याचबरोबर व्हिटमिनसुद्धा भरपूर मात्रेत आढळतात भाज्यांमध्ये स्निग्धता कमी मात्रेत असते.
आतड्यांचे रोग, मलावरोध, कन्सर, जुलाब, आंबट ढेकर, संधिवात, वात, उदार रोग, काविळ, कृमिरोग, त्वचा रोग आणि नेत्ररोग इत्यादी आजारांपासून ताज्या आणि हिरव्या भाज्यांचे अधिकाधिक मात्रेमध्ये सेवन करण्याने बचाव केला जाऊ शकतो.
आपण आपली काया निरोगी राखू इच्छित असाल टर आजपासूनच आपल्या भोजनात हिरव्या पालेभाज्यांचे अधिक सेवन करण्यास प्रारंभ करावा.
काविळीमध्ये या गोष्टींवर ध्यान द्या
काविळीच्या रुग्णाला खाण्यासाठी गहू अथवा चण्याची रोटी द्यावी. पीठ कोंड्यासहित जाड असल्यास लाभकारी ठरते.
मुग, तूर, मसूर अथवा कुळथीचे सूप, स्निग्धता काढलेले तसेच लोखंडाच्या कढईमध्ये गरम केलेले गाईचे दुध, पातळ दलिया, पातळ खिचडी, पालेभाज्या, गाईच्या दुधाचा पातळ मठ्ठा अथवा दही व फळ लाभकारी आहे.
दुधी भोपळा, पांढरा भोपळा, भात, पडवळ इत्यादी लाभकारी आहेत. मनुके, आवळा खावेत.
काय खाऊ नये ?
मांस, मासे, मिरची , तेल ,गरम मसाला, पुरी, कचोरी खाऊ नये. टोमटो, आंबट फळे, ब्रेड, इडली, तळलेले पदार्थ तसेच सुकेमेवे जसे बदाम, अक्रोड इत्यादींचे सेवन कदापि करू नये.