हृदयरोगावर नियंत्रण करण्यासाठी योग्य आहार घ्या
लठ्ठपणा म्हणजे जरुरीपेक्षा अधिक वजन, अधिक रक्तदाब आणि रक्तातील स्निग्ध द्रव्ये ( कोलेस्टेरॉल ) अधिक वाढणे हि हृदयरोग उत्पन्न होण्याची तीन प्रमुख कारणे आहेत.
योग्य प्रकारच्या आहाराने हृदयरोगाच्या या तीनही प्रमुख कारणांवर नियंत्रण करता येते, असे आता सिद्ध झाले आहे. विशेषत: वजन व कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी पुढील आहार घ्यावा.
१) दिवसातून एक वेळा तरी हिरवी पालेभाजी खावी.
२) अंड्यातील पांढरा बालक खावा.
३) चिकन आठवडयातून १० ते १२ तोळे शक्यतो शिजवून आणि फारसे तेल न घालता घ्यावे , तर शाकाहारी माणसांनी गहू, डाळी, घेवडा, वाटणे खाण्यास हरकत नाही.
४) ब्रेड ४ स्लाईस किंवा गव्हाची १ पोळी खावी.
५) साखर फक्त १ ते २ चमचे चहा-कॉफीमधून घ्यावी.
६) साय काढलेले दुध प्यावे.
७) रात्री झोपताना संत्री, मोसंबी यांपैकी एखादे फळ खावे.
पुढील पदार्थ अजिबात खाऊ नयेत.
लोणी, सायीसकट दुध व त्याचा खावा, लस्सी इत्यादीसारखे पदार्थ, मिष्टान्ने तेलात तळलेले पदार्थ, बात, रताळी यांपासून तयार केलेले पदार्थ खावू नयेत.