विवाह जुळविताना कुंडली गुणमेलन का आवश्यक असते?

हिंदू संस्कृतीमध्ये  मुलामुलींचा विवाह करताना येणारया स्थळांचा कुंडलीतील गुण जुळत असतील तरच विचार केला जातो.
वधू- वरांच्या कुंडल्या एकमेकांशी किती जुळतात हि बाब फारच महत्त्वाची ठरते. यालाच कुंडली गुणमेलन असे नाव आहे.

प्राचीन ऋषीमुनी व ज्योतीषतज्ञांनी कुंडली गुणमेलनाचा वर्ण, वैश्य, योनी, गण, नाडी, तारा, ग्रहमैत्री व भुकट या प्रकारातून विचार केला आहे.
या सर्व गोष्टी जातकाच्या जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रामधून संचार करीत असतो, त्यावर अवलंबून असतात. चंद्र हा मनाचा कारक असतो, तर शारीरिक संतुलनासाठी कुंडलीतील लग्नस्थान महत्त्वाचे ठरते. म्हणूनच कुंडली गुंमेलनासाठी  चंद्र व लग्न या दोन्ही बाबींचा विचार केला जातो.

विवाह जुळविताना कुंडली गुणमेलन का आवश्यक असते?
विवाह जुळविताना कुंडली गुणमेलन का आवश्यक असते?

वर्ण जुळला तर एक गुण दिला जातो. वैश्य गुण जमला तर २ गुण तारा गुण मिळाल्यावर व जुळल्यावर ४, ग्रहमैत्री जुळल्यावर ५, गण जुळल्यावर ६, तर भकूट  जुळल्यावर ७ गुण दिले जातात.
शेवटची नाडी गुणमेलनासाठी ८ गुण राखून ठेवलेले आहेत. हे सर्व मिळून ३६ गुण होतात, प्रचलित नियमानुसार १८ पेक्षा जास्त गुण जमले तर अशा वधू-वरांचा विवाह इष्ट मानला जातो.
नदीचा संबंध थेट रक्ताशी असल्यामुळे तिला सर्वोच्च स्थान आहे. परंतु फक्त गुनमेलनाने जुळून भागात नाही, तर वधूवरांचे आरोग्यही महत्त्वाचे ठरते.

यासाठी लग्न व लग्नेश यांची स्थितीही महत्त्वाची ठरते. वधूवरांच्या राशी मित्रराशी आहेत कि, शत्रूराशी हि गोष्टही तपासली जाते.
वैवाहिक जीवन सुखी करण्यामध्ये प्रथम, द्वितीय, सप्तम व अष्टम भावात स्थित असणारे अशुभ ग्रह अडथला उत्पन्न करतात.
सुर्य, मंगल, शनी,राहू, केतू  यांना अशुभ ग्रह मानले जाते. कन्येचा कुंडलीतील अष्टम व द्वितीय भाव हा बारकाईने तपासाला जातो.
कारण त्यातून प्रथम व सप्तम भावामध्ये अशुभ ग्रह असेल, तर वैवाहिक जीवन नरकप्रद होते.
या दोषासाठी लग्नापासून, चंद्रापासून, तसेच शुक्रापासून प्रथम, द्वितीय, चतुर्थ, सप्तम, अष्टम, द्वादश या स्थित मंगल दोषपूर्ण मानला जातो.
वरवधू दोघांच्याही कुंडलीत हा दोष असेल तर त्याचे आपोआपच निराकारण होते.

हे ही वाचा : Motivational Status in Hindi

Leave a Reply