अश्या प्रकारे वास्तुपूजनाने नुकसानी टळते

फेंगशुई, वास्तुशास्त्र

वास्तुपुरुष हा सर्व भूखंड व त्यावरील बांधकामाची देवता आहे. त्याचे पूजन करणे व त्याच्या नावाची आहुती देणे अनिवार्य असते.

या बदल्यात वास्तुपुरुष तेथे राहणार्‍यांच्या सुखशांतीचे रक्षण करतो. वास्तुपुरुष मंडलानुसार वास्तुपुरुषाचे डोके ईशान्येला तर पाय नैऋत्येला असतात.तो भूमीवर अधोमुख अवस्थेत चित्र घेणे चित्रात दाखविल्याप्रमाणे पालथा स्थित आहे.

वास्तुपुरुष हा पूर्ण चौरस आकारात स्थित आहे व यामुळे पूर्ण चौरस आकाराचा भूखंड वास्तुशास्त्रदृष्ट्या सर्वश्रेष्ट ठरतो.

घर खरेदी करताना हि दक्षता घ्यावी

 वास्तुपुरुशाचे वर्णन करताना मयमत सिद्धातानुसार असे म्हटले गेले आहे की, प्रत्येक मानवीय घरातील सौभाग्य व दुर्भाग्य यासाठी वास्तुपुरुषच जबाबदार ठरतो.

याच कारणांमुळे बुद्धिमान पुरुषांनी त्याच्या शरीरांगांना  इज पोहोचविण्याचे टाळावे नाही तर ग्रहस्वामीच्या  शरीरांगांना असंख्य त्रास सहन करावा लागतो.

वास्तुपुरुष पूजनात ब्रह्म, विष्णू, महेश व इतर सर्व देवी-देवतांची पूजा केली जाते.ब्रह्मा व वास्तुपुरुष मंडलाच्या सर्व देवी-देवतांची पूजा करून त्यांना नैवैद्य हा अर्पण केला जातो.

घरातील वडीलधारयांना ब्रह्माडांतील दाही दिशांना, सहा ऋतूंना पंचतत्त्वांना ( अग्नी, जल, वायू ,आकाश व पृथ्वी ) नमन केले जाते. व त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. वास्तुपूजा वातावरणात उपस्थित असणारया सर्व नकारात्मक ऊर्जाना नष्ट करते.

 वास्तुशांती व पूजन यामुळे भावी नुकसान व दुर्भाग्य यापासून ग्रहस्वामीचे रक्षण केले जाते.

पौराणिक वास्तुशांती मंत्र 

ओम नमो भगवते वास्तु पुरुषाय महाबल पराक्रमाय, सर्वाधि  वासाश्रित शरीराय ब्रह्मपुत्राय,सकल ब्रह्माण्ड धारिणे भूभारार्पित मस्तकाय ,पूरपतन प्रासाद ग्रहवापी सर:कृपादे :संनितेश सान्निध्य कराय, सर्व सिद्धीप्रदाय प्रसन्न वदनाय विश्वंभराय , परम पुरुषाय शुक्रवरदाय कास्तेष्यते  नमस्ते “

हे ही वाचा : Dosti Shayari in Hindi

Leave a Reply