जगण्याने शिकवलेल्या गोष्टी

विचार

१) जगणे हे काही सुसह्य नसते तरीही ते चांगले असते.
२) कधीही शंका वाटली की निर्णय घेऊन पुढे निघा
३) जीवनाचा कालावधी छोटा आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त आनंद घ्या.
४) तुम्ही जेव्हा आजारी  असाल तेव्हा तुमची नोकरी तुमची काळजी घेणार नाही. तुमचे कुटुंबीय आणि मित्र तुमची काळजी घेतील.
५) प्रत्येक महिन्याला तुमच्या क्रेडीट कार्डवरील रक्कम चुकती करा.
६) प्रयेक वादात तुम्ही जिंकलेच पाहिजे असे नाही. फक्त स्वत:शी प्रामाणिक राहा
७) एकटे असताना रडण्यापेक्षा कुणाच्या तरी सोबतीत रडा.
८) देवावर रागावलात तरी चालेल. तो तुमचे रागावणे सहन करतो.
९) तुमच्या पहिल्या कमाईपासूनच निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करायला सुरवात करा.
१०) भूतकाळाचा विचार करत वर्तमानकाळ वाया घालवू नका.
११) स्वत:ची तुलना इतरांशी करू नका.
१२) रिलेशनशिप तुम्हाला गुप्त ठेवायची असेल तर तुम्ही त्यात न पडलेलेच बरे.

Leave a Reply