स्वत:साठी वेळ काढा, तणाव नाहीसा होईल

लाइफस्टाइल

आपण पहिल्यांदा हा विचार करा कि आपल्यासाठी आपण वेळ का काढू इच्छित आहात ? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा स्वत:च स्वत:ला विचाराल तेव्हा आपल्या तोंडून हेच उत्तर येईल कि,
 मी माझ्या जीवनाला कंटाळलो आहे आणि या जीवनात काढलेला  वेळ  आपल्यासाठी पाहिजे आहे.तेव्हा खाली दिलेल्या काही गोष्टी वाचा व थोडा विचार करा.
१) निर्धारित वेळेनुसार काम करावे.
आपण सर्वात अगोदर एक यादी तयार करून घ्या, ज्यात कोणते काम कोणत्या वेळेला व किती वेळात करायचे आहे.
यामुळे कुठलेही काम योग्य वेळेत पूर्ण करू शकाल आणि वाचलेल्या वेळेत तुम्ही आरामसुद्धा  करू शकता. त्या रिकाम्या वेळेत आपण आपल्या आवडत्या छंदानुसार काम करा, जेणेकरून तुम्हाला कंटाळा येणार नाही.

स्वत:साठी वेळ काढा, तणाव नाहीसा होईल
स्वत:साठी वेळ काढा, तणाव नाहीसा होईल

२) सुट्टीच्या दिवसी काही प्लॅन करा
कार्यालयाच्या कामाचा ताणकमी झाल्यानंतर काही दिवस सुट्टी घ्या आणि आपल्या घरातील माणसांसोबत कुठेतरी फिरण्यासाठी जा.
आपल्याला मित्रांसोबत जाण्यातच अधिक चांगले वाटत असेल, तर खुशाल जा. ज्यांनी आपल्यासाठी सदैव वेळ दिला आहे, सहकार्य दिले आहे, त्यांच्यासाठी पण थोडा वेळ द्या.
३) व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका
रोज येणारया समस्येमुळे व्यक्ती हा व्यायाम करणेच सोडून देत आहे. समस्या येणे स्वाभाविकच आहे: परंतु त्यासाठी आपलं जीवन धोक्यात घालावं हे मात्र न पटण्यासारख आहे. त्यामुळे व्यायाम केल्याने मन आणि शरीर दोघांना स्फूर्ती मिळते.
४) घरात दुसर्‍यांचा  आधार घ्या.
अचानक दुसरयाकडून मदत घेणं थोड वेगळं वाटतं, म्हणून आपण आपली प्रत्येक अडचण आपल्या घरच्या सदस्यांसोबत विशेष म्हणजे आपल्या नवरयासोबत चर्चा करू शकता  किंवा जास्त दबावात जगण्यापेक्षा आपण घरातील सर्व सदस्यांना आपली छोटी-छोटी कामे करून घेण्याची विनंती करू शकता. ज्यांच्या सोबत वेळ घालवणे चांगले वाटते त्यासाठी वेळ जरूर काढा.

जर आपणास कोणी प्रेमात धोका दिला असेल व तुम्ही दु: खी असाल तर Sad Status Marathi च्या सहाय्याने तुम्हीही आपल्या भावना शेअर करू शकता.  आपल्या दु: खी मनाच्या भावना Sad Status Marathi च्या सहाय्याने व्यक्त करा. 5000+ पेक्षा अधिक सैड स्टेटस मराठी चा संग्रह फक्त आपल्यासाठी.