ऑनलाईन अफ़ेअरमुळे वैवाहिक नात्यात वितुष्ट येण्याचा धोका

रिलेशनशिप

ऑनलाईन  चीटिंगचे परिणाम भयंकर आहेत. घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता , चिंता, डिप्रेशन, तीव्र दुःखांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून येतात. एकमेकांशी संवाद साधणं , एकमेकांना वेळ देणं याला प्राधान्य द्यायला हवं. लग्नाचा जोडीदार बाजूला बसलेला असताना एकस बॉय अथवा गर्ल फ्रेंडला मेसेज पाठवण किंवा चाट करन कठीण नाही. हि फसवणूक कशासाठी?
चैटिंग करण , मेसेज पाठवण हे हार्मलेस आहे असा युक्तिवाद काही जण करतात.  मात्र वरकरणी हार्मलेस  वाटणाऱ्या या प्रकाराचे दुष्परिणाम अनेक आहेत.

online affair


फाजील धाडस
मुळात आपल्या पार्टनरची फसवणूक करावी असं का वाटतं? ”त्यात काही जणांना थ्रिल वाटतं. असा प्रकार करत असताना व्यक्ती हि कॉम्पुटरच्या मागे सुरक्षित असते त्यामुळे तिच्यात एक फाजील धाडस आलेलं असतं. ‘इतर जे करतात ते मीही करू शकतो. मला कोणी पकडू शकत नाही’ अशी भावना निर्माण होते. ज्यांच्यात व्हर्च्युअल करेज-धाडस निर्माण होतं ते असे प्रकार करतात; पण हे खर धाडस नाही.
फसवा युक्तिवाद

सायबर चीटिंग हे व्हर्च्युअल  वर्ल्डमध्येच होतं आणि यात जे भावनिकरीत्या गुंतलेले असतात त्यांना स्वत:च वागणं चुकीचं, अप्रामाणिक वाटत नाही.
” मी काही कोणाला प्रत्यक्षात बघत नाही किंवा सोअर्स करत नाही ती फसवणूक कशी होईल’ असा युक्तिवाद ते करतात. “ती फसवणूकच असते. जर दोन व्यक्तींचं नातं कसं असावं याचे काही नियम असतील तर ते सायबरवरही पाळायला हवेत. वास्तव आणि आभासी अशी आपल्या जीवनाची विभागणी झालेली नाही. तुमची निष्ठा हि सगळीकडे असायला हवी. माणसाचं व्यक्तिमत्व हे संमिश्र आहे. त्यामुळे फसवणूक चुकीचीच आहे, “
वेळ न देण्याचा परिणाम

आजकाल पती -पत्नी किंवा पार्टनर्स  हे बरेचदा ऑनलाइन बिझी असल्याने एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यातून त्याचा भावनिक संपर्क तुटतो. याचा परिणाम नात्यावर होतो.  स्वत:च्या पार्टनरमध्ये भावनिकरीत्या गुंतलेले का नाहीत हा खरा प्रश्न आहे. जर केअच नात्यात तुम्ही मनाने गुंतलात तर ऑनलाईन भटकंतीची गरजच भासणार नाही. ऑनलाईन  चीटिंगचे परिणाम भयंकर आहेत. घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता , चिंता, डिप्रेशन, तीव्र दुःखांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून येतात. एकमेकांशी संवाद साधणं , एकमेकांना वेळ देणं याला प्राधान्य द्यायला हवं.

हे ही वाचा : Emotional Quotes in Hindi