हायपर टेन्शनमुळे किडनी निकामी होण्याचा धोका!

आरोग्य ज्ञान

अमेरिकेत करण्यात आलेल्या नव्या संशोधनाप्रमाणे तरुण आणि माध्यम वयातील लोकांमध्ये जर हायपर टेन्शन असेल, तर त्यांनी वेळीच काळजी घ्यायला हवी,, नाहीतर हळूहळू त्यांचे महत्त्वाचे अवयव निकामी होण्याचा धोका आहे .

आपलं ब्लड प्रेशर ८०-१२० या मर्यादेत हाये, म्हणजे आपलं अगदी उत्तम चाललं आहे असं अनेकांना वाटत असतं . मात्र, अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे ब्लड प्रेशरची न्यूनतम पातळी बरोबर आहे; पण उच्च पातळी जर १२० वरून १४० वर गेलेली असेल, तर तुम्ही फारच सावधान राहायला हवं . त्यातही १८ ते ४९ वयातील स्त्री, पुरुषांना दक्षतेचा इशारा देताना अभ्यासक सांगतात- ” हायपर टेन्शनकडे दुर्लक्ष करू नका.तातडीने त्यावर उपचार करा. लाइफस्टाइल बदला. नाहीतर हे हायपर टेन्शन हळूहळू शरीर पोखरेल भविष्यातलं जगणं त्यामुळे फारच अवघड होईल .”

हायपर टेन्शनमुळे किडनी निकामी होण्याचा धोका अभ्यासक म्हणतात- ‘हार्ट अटॅकही येऊ शकतो’

Blood pressure measuring studio shot
हायपर टेन्शनमुळे किडनी निकामी होण्याचा धोका!

हायपर टेन्शनचे परिणाम सांगताना अभ्यासक म्हणतात- “हायपर टेन्शनमुळे किडनीवर ताण येतो आणि निकामी होऊ शकते. शिवाय सतत टेन्शन घेण्यामुळे हार्ट अटॅकही येऊ शकतो. उच्च रक्त दाबामुळे शरीरात हृदयापासून तर संपूर्ण शरीरभर ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्ताचा पुरवठा करणाऱ्या नसांमध्ये बिघाड होऊ शकतो. इतरही अनेक आजार होऊ शकतात. ” शास्त्रज्ञांनी या विषयावर अनेक व्यक्तींवर बरीच वर्षे संशोधन केलं. त्यांच्यावर हायपर टेन्शनचा काय आणि किती परिणाम होतो हे तपासलं आणि हा निष्कर्ष काढला आहे.
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ,अमेरिकेतच गेल्या दोन दशकांत हायपर टेन्शनचं प्रमाण जवळजवळ दुप्पट झालं आहे. त्यात वाढच होत आहे. त्यात येत्या पाच वर्षात किमान पाच टक्के वाढ होईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे .येत्या काळात हायपरटेन्शन लवकरात लवकर समजू शकेल, यासाठी काय करता येईल यावर शास्त्रज्ञ संशोधन करीत आहे. मात्र, तोपर्यंत डॉक्टरांनाही त्यांनी सल्ला दिला आहे.

दांत दर्द के लिए घरेलू उपचार dant dard ka gharelu upay आजमाकर आप भी दांत के दर्द से छुटकारा पा सकते है।

हे ही वाचा : Attitude Quotes in Hindi

Leave a Reply