फेंगशुईनुसार असे बनवा तुमचे ऑफिस हेल्दी!

फेंगशुई

फेंगशुईत घरातील सदस्यांचे जीवन आरोग्यदायी बनावे यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. हेच नियम ऑफिसच्या रचनेतसुद्धा अवलंब करून तुम्ही आपल्या ऑफिसचे वातावरण जास्त ऊर्जायुक्त व अर्थातच जास्त हेल्दी बनवू शकता.
आरोग्यदायी  जीवन जगण्यासाठी केवळ घरातच नव्हे तर ऑफिसमध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जेची अत्यंत आवश्यकता असते. फेंगशुईतील काही उपाय योजून तुम्ही आपल्या ऑफिसमधील वातावरण अधिक हेल्दी बनवू शकता.
यामुळे ऑफिसमधील तुमच्या व तुमच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत तर भर पडतेच; परंतु तुम्ही व्यवसाय व करिअरमध्ये नवनवी यशोशिखरेहि गाठू शकता.

१) घराप्रमाणेच  आपण ऑफिसमध्येही कळतनकळतपणे  बऱ्याच निरुपयोगी व बाद वस्तू सकारात्मक ऊर्जेमध्ये बाधा निर्माण करतात यासाठी हेच उत्तम ठरते कि, अशा निरुपयोगी वस्तू ऑफिसमधून हटवून गोडाऊन वा एखाद्या अन्य ठिकाणी शिफ्ट करणेच योग्य ठरते.

फेंगशुईनुसार असे बनवा तुमचे ऑफिस हेल्दी!
फेंगशुईनुसार असे बनवा तुमचे ऑफिस हेल्दी!

२) आपल्या बसण्याच्या जागेच्याबरोबर समोर आरसा लावू नका. जर तुम्हाला मागे बघण्याची आवश्यकता नसेल तर अशा आरशाचा तुम्हाला काही उपयोगही नसतो.
परंतु जर एखादे वेळी तुम्हाला दरवाजाकडे पाठ करून बसावे लागत असेल तर मात्र तुम्ही समोरच्या बाजूस आरसा लावू शकता.
३) ऑफिसच्या सजावटीसाठी तुम्ही केवळ तुम्हाला आनंद प्रदान करणारया  वस्तूच वापरणे योग्य ठरते. यात सुंदर पेंटिंग्ज व एखादे  आर्टवर्क असू शकते.
४) ऑफिसमध्ये समाविष्ट होणारे फेंगशुई प्लांट्स  बांबू प्लांटसारखे  प्रकार ऑफिसात ठेवल्याने ऑफिसमधील आरोग्य व समृद्धी या दोन्हीमध्ये वाढ होते. यासाठी फेंगशुई  तज्ञांचा सल्ला घेऊनच ऑफिसमधील योग्य ठिकाणी असे उपाय योजावेत.
५) अशा प्लांटप्रमाणेच  फाऊनटन  ( कृत्रिम धबधबे/ कारंजी ) हि आरोग्य व समृद्धीचे सूचक असतात. जर  फाऊनटन  लावणे शक्य नसेल तर तुम्ही त्या जागी फिश  अक्वरियमहि लावू शकता
किंवा वाहत्या पाण्यासारखे एखादे पेंटिंग वा फोटोही लावू शकता.

हे ही वाचा : Love Status in Hindi

Leave a Reply