कुंडलीमध्ये मांगलिक दोष कसे निर्माण होतात ?

वार्षिक भविष्य, शास्त्र

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून मंगल हा फार महत्वाचा ग्रह आहे. तो व्यक्तीला साहसी व रागीट बनवितो .
शुभ-अशुभ प्रभावानुसार हा ग्रह  व्यक्तिमत्त्वाचे गुण व कार्यक्षेत्र ठरवितो. मंगळाचा अनिष्ट प्रभाव हा कुंडलीतील चौथ्या, आठव्या भावात सर्वाधिक दिसून येतो. जाणून घेऊ या विभिन्न भावातील किंवा राशीतील मंगल ग्रहाच्या दोषाबाबतची उपयुक्त माहिती :
प्रथम भाव : व्यक्तीला रागीट बनवितो व शस्त्राद्वारे इज  पोहोचवतो . कधी-कधी व्यक्तीला लैंगिक आजारही होतात.
चतुर्थ भाव: आकस्मिक मृत्यू किंवा आगीत जळून जाण्याची स्थिती उत्पन्न करतो.
अष्टम भाव : नेहमी चोरीचे भय, नाश प्रवृत्ती व अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण करतो.
बारावा भाव : पत्नीपासून विरह, आर्थिक संकट व विवाहासाठी विलंब

कुंडलीमध्ये मांगलिक दोष कसे निर्माण होतात ?
कुंडलीमध्ये मांगलिक दोष कसे निर्माण होतात ?

खालील दशांमध्ये मंगल दोष आपोआप नष्ट होतो :

१) जर प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम व द्वादश या भावामध्ये मंगळाबरोबर शनि असेल तर .
२) राशींच्या आधारावर मेष  राशीच्या प्रथम भावामध्ये, वृश्चिकेच्या  चतुर्थ भावामध्ये , मकरेच्या सप्तम भावामध्ये, कर्केच्या अष्टम भावामध्ये, धनुच्या द्वादश भावामध्ये मंगल आपला कोणताही कुप्रभाव दाखवीत नाही.
३ ) वरच्या कुंडलीत ज्या भावात मंगल असेल तर त्याच भावामध्ये वधूच्या कुंडलीत बलशाली किंवा पापी ग्रहासह स्थिर असेल, तर मांगलिक दोष आपोआपच नष्ट होतो.
४) जर जातकाच्या वयाचे २८ वे वर्ष उलटून गेले असेल तर.
५) जर कुंडलीच्या दुसरया स्थानामध्ये शुक्र व चंद्र एकत्र स्थित असतील तर.
६) कुंडलीतील गुरु जर मंगळावर पूर्ण दृष्टी टाकत असेल तर.

उपाय :
१) कोणतीही हत्तीशी संबंधित वस्तू घरात ठेवू नये. ( उदा.  हस्तिदंत , हत्तीचे केस इ. )
२) कोणालाही छळून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करू नये.
३) हनुमानाची उपासना करावी. मंगल मंत्राचा जप करावा.
४) मंगळवारी गोड प्रसाद वाटावा किंवा गोड मिष्टान्न सेवन करावे.
५) खिशामध्ये नेहमी लाल रंगाचा रुमाल ठेवावा .
६) पोवळे रत्न धारण करणेही हितावह ठरते.

हे ही वाचा : Dosti Shayari in Hindi

Leave a Reply