ग्रह प्रवेशासाठी शुभ महिना, नक्षत्र, तिथी वार

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र  नियमानुसार गृहनिर्माण कार्य पूर्ण झाल्यानंतर ग्रहस्वामीने आपल्यासाठी अनुकूल शुभ मुहूर्त पाहून त्या शुभमुहूर्तावर त्या घरात राहण्यास प्रारंभ करावा. नवनिर्मित घर व दुरुस्ती केलेले जुने घर यातील ग्रह ग्रहप्रवेशासाठी  वेगवेगळे मुहूर्त असतात. शुभमुहूर्तावर केले गेलेले प्रत्येक कार्य हे कल्याणकारी व सुखद ठरते.

नूतन गृहप्रवेश – वास्तुशास्त्र नियमानुसार निवड केलेल्या भूमीवर नवे घर बांधून त्यात राहण्यासाठी जेव्हा प्रथम प्रवेश केला जातो तेव्हा त्याला नूतन गृहप्रवेश म्हणतात.

ग्रह प्रवेशासाठी शुभ महिना, नक्षत्र, तिथी वार
ग्रह प्रवेशासाठी शुभ महिना, नक्षत्र, तिथी वार

नूतन ग्रह  प्रवेशासाठी शुभ नक्षत्र, वार, तिथी लग्नाचा विचार खालीलप्रमाणे केला जातो.  
शुभ नक्षत्र- उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाडा, उत्तरा भाद्रपद , रोहिणी, मृगशीरा, चित्रा,अनुराधा व रेवती हि नक्षत्रे नूतन ग्रहप्रवेशासाठी शुभ मानतात.
शुभ तिथी – शुक्ल पक्षाची द्वितीय, तृतीया, पंचमी, षष्ठी , सप्तमी, दशमी, एकादशी , त्रयोदशी या तिथी नूतन ग्रहप्रवेशासाठी शुभ असतात.
शुभ वार- नवनिर्मित घरात प्रवेश करण्यासाठी सोमवार, बुधवार, , गुरुवार व शुक्रवार हे दिवस शुभ मानले जातात.
शुभ लग्न- नूतन गृहप्रवेशासाठी वृषभ, सिंह, वृश्चिकव कुंभ राशीचे लग्न उत्तम ठरते. मिथुन, कन्या, धनु व मीन राशीचे लग्न मध्यम असते.
लग्नेश बली केंद्र त्रीकोनामध्ये शुभ ग्रह व ३,६,१० व ११ व्या  भावामध्ये पाप ग्रह असणे आवश्यक असते.
वास्तुशास्त्र नियमांनुसार ग्रहनिर्माणाचे कार्य प्रारंभ करते वेळीच वास्तुपुरुषाची विधिवत पूजा केली जाने इष्ट ठरते;
परंतु ती झाली नसल्यास वास्तुशांतीच्या वेळी विद्वान ब्राह्मणाकडून हा विधी पार पाडावा. सर्व निमंत्रित नातेवाईकांना भोजन द्यावे.
शुभ मुहूर्तावर परिवाराचे सदस्य व नातेवाईकांबरोबर तोरणे, फुलांच्या माळा लावलेल्या घरात शंखनाद व मंगल वाद्य वादनासह गृहप्रवेश करावा.
दुरुस्ती केलेल्या जुन्या घरातील गृहप्रवेश – जीर्णोधार केलेल्या घरातील गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त बघताना खालील बाबींचा विचार आवश्यक ठरतो.
शुभ नक्षत्र – जीर्णोधार केलेल्या घरात प्रवेश करण्यासाठी शतभीषा, पुनर्वसु, स्वाती, घनिष्टा, अनुराधा, रोहिणी, मृगशिरा ,रेवती, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाडा, उत्तराभाद्रपद हि नक्षत्रे शुभ व मंगलकारी आहेत.
शुभ वार-  सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार .
शुभ तिथी- शुक्लपक्षाची द्वितीया, तृतीया, पंचमी,सप्तमी, दशमी, एकादशी, द्वादशी व त्रयोदशी.
शुभ मास- कार्तिक, मार्गशीर्ष, श्रावण, माघ, फाल्गुन, वैशाख , ज्येष्ट .
शुभ लग्न-वृषभ , सिंह , कुंभ -ऊऊटां, मिथुन, कन्या धनु मीन -मध्यम , लग्नेश बली केंद्र त्रीकोनामध्ये शुभ ग्रह व ३,६,१० व ११ व्या भावामध्ये पापग्रह आवश्यक.

हे ही वाचा : Life Quotes in Hindi

Leave a Reply