यशाला गवसणी घालण्यासाठी

लाइफस्टाइल

नवे बदल नवे मार्ग शोधा
अनेकदा आपल्या आधीच्या अनुभवाच्या आधारे आपण नव्या कामाकडे पहात असतो. पण त्यासंदर्भात सहकारयांचे काही वेगळे विचार असू शकतात. ते स्वीकारल्याने कंपनीचा , टीमचा फायदा होणार असतो. असतो. कदाचित तुम्ही त्या विचारानुसार किंवा त्या वाटेने गेलेला नसता त्यामुळे तुम्हाला ती आव्हानात्मक वाटते आणि तुम्ही त्यात नसलेले दोष दाखवायला सुरवात करता. त्यातून टीममध्ये अविश्वासाचे वातावरण तयार होते. यशस्वी व्यक्ती नेहमीच नव्या विचारांचे आणि नव्या वाटांचे स्वागत करते.

यशाला गवसणी घालण्यासाठी
यशाला गवसणी घालण्यासाठी

नवे शिकण्याची तयारी ठेवा
यश म्हणजे सतत नव्याकडे झेपावण्याची प्रक्रिया. त्यासाठी सतत नवे शिकण्याची तयारी हवी. शिकणे म्हणजे एखादी पदवी किंवा अभ्यासक्रम नव्हे. एखाद्या प्रोजेक्टसाठी नेमून दिलेले काम ठरलेल्या वेळेच्या आधी करून दाखवणे .
तुमच्यावर एखादा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची जबाबदारी आल्यावर  सहकारयांसोबत कार्यक्षमपणे काम करण्याचे तंत्र अवगत करणे आवश्यक ठरते. त्याची तयारी तुमच्या पहिल्या प्रोजेक्टच्या कामात झालेली असते.
पहिल्या प्रोजेक्टमध्ये टीमचे सदस्य म्हणून जीव ओतून काम केले असेल तर त्या शिकण्याचा फायदा तुम्ही लीडर झाल्यावर होतो. व्यवसायातील बदल स्वीकारा.
सकारात्मक मन:स्थिती आणि पुढाकार घेण्याची वृत्ती असल्याशिवाय तुम्ही नव्या आव्हानांचा पुरेशा ताकदीने सामना करू शकणार नाही. यश चाखल्यावर नव्या यशाकडे जाताना अनेक बदलांना सामोरे जावे लागते.
कदाचित कामाचे ठिकाण बदलेल, स्वरूप बदलेल, सहकारी बदलतील. हे सगळे स्वीकारणे वाटते तेवढे सोपे नसते, पण बदल अपरिहार्य आहे हे लक्षात ठेवून वाटचाल केला कि सगळी आव्हाने सोपी वाटू लागतात.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा
नवी आव्हाने स्वीकारताना तंत्रज्ञानाबरोबरील मैत्री महत्त्वाची ठरते. नवीन आलेल्या यंत्रणेची तुम्हालाच माहिती नसेल तर हाताखालील लोक काहीही  कारणे सांगून कामे टाळतात .
वेळ पडल्यास स्वत:चे हात काळे करून घेत हे टीममधील सदस्यांना कळले कि कुणीही तुम्हाला चॅलेज करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानात आघाडीवर असणे हे एक यशस्वी व्यक्तीचे लक्षण आहे.

प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. प्रत्येक दिवसाची सकाळ हि आपल्यासाठी खास असते. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सर्वजण सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना ( Good Morning Message In Marathi ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल.

Leave a Reply