मधुर राखा जीवनातील महत्त्वाचे नाते
पती- पत्नीसह नाते जीवनातील सर्वात महत्त्वाचे नाते असते. ते महत्त्वपूर्ण आणि मधुर बनवणे सर्वस्वी पती- पत्नीच्या हातात असते. इतर कोणाच्या नव्हे. यासाठी ….
समजून घेण्याचा प्रयत्न करा –
नाते उत्तम राखण्यासाठी आपल्याला आपले वागणे व दुसऱ्याची समाज कशी आहे, हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. स्थिती व तथ्य जाणून समजण्याचा प्रयत्न करा. रोमान्सशिवायही जीवन आहे. तज्ज्ञांच्या मते जी दापत्ये शांत दिसत असतात वा ज्यांच्यामध्ये अजिबात भांडण होत नसते त्यांच्यामध्ये धोक्याची शक्यता जास्त अस्डते. त्यांच्यामध्ये परस्पर प्रेमाचा अभाव असतो.
शीघ्रकोपिपणा टाळा- शीघ्रकोप कोणत्याही नात्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. राग आल्यानंतर फुगून बसने, समोरच्यावर डाफरणे, चिडणे यामुळे काहीही मिळत नसते. बरयाचदा रागात तोंडून गैरशब्द बाहेर पडतात. यासाठी बोलण्यापूर्वी दहादा विचार करा. बोलून समस्या सोडवता येते. यासाठी आपसात चर्चा करा.
भावना समजून घ्या- आपला पती कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी भाऊ व कोणाचा तरी मित्रही असतो, हे प्रत्येक पत्नीने समजून घ्यायला हवे. लग्नानंतर हि नाती संपत नसतात. प्रत्येक नात्याची काही अपेक्षा असते. ती नाती जोपासण्यात पतीला मदत करावी. हि नाती आपली मानल तर समस्या आपोआपच संपतील .
सहनशीलता बाळगा – जीवनात सर्वात गरजेची असते ती सहनशीलता . सहनशक्तीच्या बळावर व्यक्ती मोठ्यात मोठी लढाईहि जिंकू शकते. कोणत्याही स्थितीत मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. दाम्पत्यात सहनशीलतेला खूप महत्त्व असते.
वेळ काढा- आज स्त्रीने स्वत:ला प्रत्येक क्षेत्रात सिद्ध करून दाखवले आहे . हे आव्हान स्वीकारताना तिने खूप समस्याही सोसल्या आहेत. या समस्यांमुळे ती स्वत:चा विचारही करू शकलेली नाही. दाम्पत्यात तणाव वाढण्याचे हे एक मुख्य कारण आहे. स्वत:साठी व कुटुंबासाठी वेळ काढा. स्वत:च्या छोट्या छोट्या इच्छा दुर्लक्षु नका. हि बेपर्वाईच हळूहळू नैराश्याचे कारण बनते.
यासाठी शांतपणे बसून आपण कोठे आहोत, याचा विचार करा.
असेही प्रयत्न करा- भांडण नेहमी बोलूनच मिटेल असे नव्हे, तर कधी कधी दुसऱ्याच्या आवडीचे पदार्थ बनवल्याने त्याच्या इच्छेप्रमाणे वागल्यामुळे आपली आत्मीयता सहजतेने व्यक्तकरता येऊ शकते.
वातावरण हलकेफुलके राखण्याचाही प्रयत्न करावा.