तरुण पिढीची पहिली पसंती : अरेंज्ड मॅरेज

रिलेशनशिप

नव्या म्हणून समोर येणारया बरयाच गोष्टी पुष्कळदा जुन्या असतात. यात फॅशनपासून लग्नापर्यंत सगळ्यांचा  समावेश आहे. प्रत्येक पिढीबरोबर एक रूढी, एक प्रथा लुप्त होते आणि चार पिढ्यानंतर ती  लुप्त झालेली रूढी नवी रीत म्हणून पुनरागमन करते. याच चालीवर आता तरुण पिढीत अरेंज्ड  मॅरेज ठरवून केलेल्या लग्नाला जोरदार पसंती दिसते आहे. ‘ शादीडॉटकॉम ‘ या देशातल्या सर्वाधिक
लोकप्रिय वेडिंग वेबसाईटन आपल्या उलाढालीचा आढावा घेतल्यानंतर हे निरीक्षण जाहीर केलं आहे. गेल्या दोन- तीन वर्षात त्यांच्याकडे अशा प्रकारे लग्न करू इच्छिणाऱ्या तरुण- तरुणींच्या संख्येमध्ये  मोठी वाढ दिसते आहे. ‘ लिव्ह इन रिलेशनशिप ‘ म्हणजे विवाहाशिवायच्या सहजीवनाला कायदेशीर समंती असूनही आधुनिक पिढी त्या संबंधापेक्षा आणि प्रेमविवाहापेक्षाही ‘ अरेंज्ड  मॅरेज’ ला प्राधान्य  देत आहे, या घटनेकडे एक सामाजिक परिवर्तन म्हणूनच बघायला हवं.

         विवाहाविषयाच्या संदर्भात आणखी एक मोठ्या सामाजिक संस्थेन देशाच्या १८ राज्यांमधल्या ३० हजार तरुणतरुणींचा  सर्व्हे

केला होता. तिथेही ७४% युवावर्गान  ‘ अरेंज्ड  मॅरेज’ च्या बाजून कौल दिला. यावरून प्रेमविवाहांचा  जमाना संपला, असा थेट निष्कर्ष काढता येणार नाही, पण प्रेम विवाहाच्या  बरोबरीनं आजची पिढी ‘ अरेंज्ड  मॅरेज’ चा विचार करते आहे, यात दुमत नाही. प्रेमविवाहांना आठव्या आणि नवव्या दशकांमध्ये अभूतपूर्व पसंती होती. ती तात्कालीन पिढीचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा होता म्हणाना . आठव्या दशकापर्यंत भारतातल्या आधुनिक, सुशिक्षित ,आणि शहरी समाजातही ठरवलेल्या /जुळवलेल्या लग्नाची प्रथा होती. तरुण पिढीवर कुटुंब आणि समाज यांच्याकडून अनेक नैतिक निर्बंध अलिखितपणे लादले गेले होते. त्याच सुमारास स्त्रियांना शिक्षण आणि नोकरी यांच्याबाबत संधी मिल्तु लागली आणि त्या बरोबर स्वातंत्र्याची इच्छा निर्माण झाली. ती अर्थात जोडीदाराच्या निवडीशी निगडीत होती. पालकांनी आपली पसंती आमच्यावर लाडू नये. आमचा जोडीदार आम्हाला निवडू द्या. अशी त्या काळातल्या तरुण स्त्री-पुरुषांची पालकांकडे( आणि समाजाकडे ) मागणी होती.

तरुण पिढीची पहिली पसंती : अरेंज्ड मॅरेज
तरुण पिढीची पहिली पसंती : अरेंज्ड मॅरेज

            त्या काळातल्या तरुण पुरुषावर नक्षलवादी क्रांतीचा आणि अन्य  सामाजिक परिवर्तनाचा प्रभाव होता. ज्यांना त्या क्रांतीमध्ये प्रत्यक्ष भाग घेणं शक्य नव्हतं, त्या युवकांनी पारंपारिक सामाजिक रुढीप्रथांविरुद्ध  वैचारिक बंद पुकारलं. मुलगी बघून लग्न करणं आणि हुंडा घेणं या दृष्ट प्रथांना सक्रिय विरोध म्हणून प्रेम जमलं आणि लग्नापर्यंत गोष्ट आली कि , आपल लग्न ठरवलंय आणि तुमच्या
सुनेची तुम्हाला भेट घडवतो, असं सरळ सांगू लागले. पालकांची पसंती आणि समंती यांना त्यानं जागाच ठेवली नाही ! आठव्या- नवव्या दशकातली राजकीय आणि सामाजिक परिवर्तन तरुण पिढीच्या विवाहस्वातंत्राच्या मागणीला पोषक ठरली . राजीव गांधी याच्या राजवटीतल तंत्रज्ञानाची सुरुवात तरुणाईला केंद्रस्थानी ठेवणारी होती युवाशक्ती जागवण्याचा तो हेतूपूर्वक  प्रयत्न नव्हता ; परंतु
तंत्रज्ञान नवी पिढीच  प्रामुख्यांन वापरणार होती, त्यामुळे आपोआप तिला सामाजिक सत्तेत वाट मिळाला. म्हणूनच ती पिढी जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य मागू शकली. पालकांनी लग्न जुळवण्याच्या प्रयत्न केलाच, तर आधी’ कमिटेड ( वचनबद्ध ) असलेले तरुण-तरुणी त्या लग्नाला स्पष्टपणे नकार देऊ लागली . नवव्या दशकांत उदार आर्थिक व्यवस्था तरुण पिढीला भरपूर पैसा देऊन तिचं सामर्थ्य वाढवलं. या आर्थिक स्वातंत्र्यान या पिढीला’ लिव्ह इन रिलेशनशिप ‘ आणि लग्न झालेलं नसलंतरी स्वतंत्र राहणं, या गोष्टीसाठी आत्मविश्वास दिला. पैशासाठी पालकांवर अवलंबून राहाणं संपल्यामुळे एकट्यानं स्वतंत्र जगणं व सर्व निर्णय आपले आपण घेणं, शिक्षण व नोकरीसाठी परदेशात स्थायिक होणं, त्याही  बाबतीत पालकांच्या समंतीची गरज न वतन, या नव्या बदलांची चाहूल नवव्या दशकांत लागली.
           नव्या सहस्त्राकामध्ये पोचताना तरुण पिढीला आपली करिअर सर्वाधिक महत्त्वाची वाटत होती. प्रेमाची गरज तिला होती, पण त्यासाठी लग्नाची आवश्यकता वाटत नव्हती . करिअर वाढवण्यासाठी स्त्री व पुरुष दोघांना स्वातंत्र्य आणि वेळ यांची गरज वाटत होती. त्याकरता मातृत्व -पितृत्वाची  वेळखाऊ  आणि बंधनकारक परंपराही त्यांनी झुगारून दिली. लग्न केलंच, तरी आई वडिलांबरोबर
राहण्याची गरज पुरुषाला वाटेनाशी झाली. लग्नाचा निर्णय पक्का होताच भावी पती- पत्नींनी आपल्या स्वतंत्र घराची व्यवस्था करण्याची प्रथा पडली. घरांकारता कर्ज मिळणं सुलभ झाल्यामुळे कर्ज काढून जोडपी आपलं घर उभारू लागली. आता चक्र उलट फिरलं आहे. एक दशकभर पैसा, सेक्स आणि लग्न. यांच्याबाबतीत अनिर्बंध स्वातंत्र्य उपभोगल्यावर तरुण पिढीच्या लक्षात आलं आहे कि,  स्वातंत्र्य म्हणून स्वीकारलेली वाट घटस्फोटाकडे  जाते आहे. शिवाय घरातल्या लहान मुलांना सांभाळायचे प्रश्न वाढत आहेत. जगण्याच्या या पद्धतीनं स्वातंत्र्य असलं तरी स्थैर्य नाही. समाधान नाही. या सहजीवनात एका छताखाली एकत्र राहाणं होतं, पण मन एकत्र येत नाहीत ! कारण या नात्यात कोणतीच कमीटमेन्ट -बांधिलकीही नाही. वडील पिढीशी किंवा कुटुंबाशी संबंध ठेवले, तर आपली करिअर आणि मुलं यांच्याबाबतीत मदत मिळते.

हा साक्षात्कार झाल्यामुळेच तरुण पिढी आता प्रेमविवाह आणि लिव्ह इन रिलेशनशिप या दोन्हीकडे पाठ फिरवून पारंपारिक विवाहपद्धतीकडे परतली आहे. विवाह हे आता या पिधीकर्ता बंधन नाही. त्यांच्या विचारप्रणालीला आणि जीवनशैलीला पूरक ठरणारी सोय आहे. मुलं पाळणाघरात ठेवणं , हि जशी एक सोय आहे, त्याचप्रमाणे आई वडिलांच्या पसंतीचा जोडीदार स्विकारण हि मोठी सोय आहे. संसार सुरु झाला कि, वाढत जाणारया जबाबदाऱ्या निभावण्याकरता आई- वडिलांचा पाठींबा, त्याची प्रत्यक्ष मदत यांची गरज पडते, हे चतुर पिढीच्या लक्षात आलं आहे आणि म्हणूनच ती राजीखुशीनं  पारंपारिक विवाहपद्धतीकडे  वळली आहे. या पिढीला आवडणाऱ्या चित्रपटमाध्यमान  देखील आठव्या- नवव्या दशकापासून कौटुंबिक एकोप्याला प्राधान्य देणारे, एकत्र कुटुंबपद्धतीचे  लाभ सांगणारे विषय सातत्यानं हाताळले . ‘ हम आपके  है कौन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ‘. या चित्रपटांनी पारंपारिक विवाहसोहळे  परत आणण्याबाबत मोठी कामगिरी बजावली. जोडीदार आपल्या पसंतीन निवडावा , पण विवाहासाठी पालकांची समंती घ्यावी, हे अहेतुकपणे पण प्रभावीपणे त्यानं तरुण पिढीच्या मनावर ठसवलं.
      दह्शात्वादामुळे वाढलेली सामाजिक असुरक्षितता आणि सतत वाढत्या महागाईमुळे होणारी ओढाताण या गोष्टी भारतीय मध्यमवर्गीय समाजात एकत्र कुटुंब पद्धतीही परत आणेल, असं समाज  शास्त्रज्ञांचा  होरा आहे. बघूया आगे आगे देखेंगे होतं है क्या ! एकत्र कुटुंबाच पुढच्या पुढे, पण २५ अब्ज डॉलर्सच्या घरात पोचलेली वेडिंग इंडस्ट्री एवढं पक्का सांगतेय कि, युवा पिढीचा आता अरेंज्ड मॅरेजला विरोध नाही. शुभं भवतु !

Leave a Reply