मधुमेहामध्ये घ्यावयाची दक्षता

आरोग्य ज्ञान

मधुमेह हा रोग सर्वपरिचित आहे. हा संपूर्ण जीवनभर राहणारा आजार आहे. म्हणूनच यावर नियंत्रण रोखण्यासाठी काही दक्षता घेणे नितांत गरजेचे असते.

मधुमेहामध्ये पुढील प्रकारे सामान्य सावधानी घ्यावी.

मधुमेह हा संपूर्ण जीवनभर राहणारा रोग आहे. म्हणूनच याच्या उपचाराची निरंतरता हीच यामधील सफलतेची कुंजी आहे. रोग्याचे वजन सामान्य करणे, मधुमेहाच्या उपचाराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

मधुमेहामध्ये घ्यावयाची दक्षता
मधुमेहामध्ये घ्यावयाची दक्षता

साधारणपणे मधुमेहाची व्यक्ति लठ्ठपणाने ग्रासित राहते.अशा वेळी उपचारांच्या दरम्यान त्याचे वजन सामन्याच्या जवळपास आणणे हा मुख्य उद्देश असतो. कारण असे दिसून येते कि, वजन थोडेशे जरी कमी केले तरी मधुमेहावर सहजपणे नियंत्रण आणले जाऊ शकते. इतकेच नव्हे तर औषधाची इन्शुलिनची आवश्यकता हि कमी होते.

मधुमेहाच्या रुग्णाने कोणत्याही कारणाने उपवास करू नये, मधुमेहामध्ये धुम्रपान वर्जित आहे. कारण मधुमेहाच्या रुग्णामध्ये रक्तवाहिन्या संबधित  वाईट परिणामांची शक्यता असते. जी धुम्रपान करण्याने वाढते.  मधुमेहाच्या रोग्याने मद्यपानापासूनही दूर राहावे. कारण मद्यपान करणारा रोगी गंभीर लो शुगरची शिकार होण्याची संभावना राहते. मधुमेहाच्या रोग्याने आपल्या पायांची देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. पायाला कोणत्याही प्रकारची जखम होऊ नये याची दक्षता घ्यावी. यासाठी योग्य मापाच्या वा उत्तम चामड्याच्या पादत्राणांचा उपयोग करावा. शक्यतो अनवाणी पायांनी चालू नये. पायाला कोणतीही जखम झाल्यास निष्काळजीपणा करू नये. त्वरित उपचार करवून घ्यावेत.

हे ही वाचा : Good Night Message in Hindi