समृद्धी हवी असेल तर घरामधील अडगळ हटवा!

फेंगशुई, वास्तुशास्त्र

फेंगशुईनुसार ‘ धन ‘ म्हणजे अत्यंत येंग अर्थात वेगवान ऊर्जा मानली जाते. घरातील किंवा ऑफिसमधील महत्वपूर्ण अशी ‘ ची ‘ ( फेंगशुईतील सकारात्मक ऊर्जा) हि तुम्हाला स्वत:ला व तुमच्या घरादाराला जास्त धन कमाविण्यासाठी उपयुक्त ठरते.
१) अव्यवस्थित व गबाळे राहून धन संचित करता येत नाही. आपले घर साफसूफ व व्यवस्थित ठेवण्याची गरज असते. खासकरून आपली काम करण्याची जागा कटाक्षाने अत्यंत स्वच्छ ठेवा.
घरातील अडगळ व भंगार सामान नकारात्मक ऊर्जा निर्माण करते व त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतात.
२) चांगला कंपास ( होकायंत्र )  वापरून तुमच्या घरातील दक्षिण-पूर्व कोपरा जाणून घ्या येथूनच संपत्ती व समृद्धीचे आगमन नियंत्रित होते.

समृद्धी हवी असेल तर घरामधील अडगळ हटवा!
समृद्धी हवी असेल तर घरामधील अडगळ हटवा!

घरातील या कोपऱ्यात यासाठी लाल कुंड्यात  मनी प्लांट वा जेड प्लांट लावावेत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
३) जर घराच्या या क्षेत्रात गार्डन असेल तर तेथे फळझाडे लावावीत. हि झाडे धनाकर्शक मानली जातात.
४) आपले पैशांचे पाकीट नेहमी स्वच्छ ठेवा. त्यात पैशांव्यतिरिक्त  जुनी बिले, पावत्या व निरुपयोगी कागद ठेवू नका.
५) लाल व पिवळ्या लिली व ग्लोडीयोलास फुलांचा सजावटीमध्ये वापर करा. या फुलात विपुल प्रमाणात येंग एनर्जि असते. लिव्हिंग, रूममधील येंग ऊर्जा वृद्धीसाठी हि फुले उंच फुलदाण्यामध्ये ठेवा.
६) कारंजी हीही ताजी ची ऊर्जा आकर्षून घेण्यासाठी प्रभावी ठरतात . घराच्या दक्षिण- पश्चिम भागात ताज्या पाण्याचे कारंजे धनाला आकर्षित करते. धबधब्यासारखी  जलाकृती घराच्या उत्तर भागात ठेवली तर करिअर उत्तम बनते.
जलप्रवाह व धबधब्याचे चित्र लावणेही यासाठी उपयुक्त ठरते ;  परंतु या चित्रातील पाण्याचा प्रवाह नेहमी वाहता दिसावा.
७) आपल्या बाथरूममधील नळ फिटीग्ज  गळकी  नसावीत नाहीतर धनहानी होते.
८) मोडक्या तोडक्या वस्तू, निरुपयोगी सामान, बंद पडलेली घड्याळे, जुने भंगार सामान, वेळोवेळी हत्वा या वस्तू महत्त्वपूर्ण अशी ‘ ची ‘ ऊर्जा घरातून बाहेर घालवितात.

हे ही वाचा : Good Morning Quotes in Hindi

Leave a Reply