तुमच्यात आत्मविश्‍वासाची उणीव आहे का?

लाइफस्टाइल

सेल्फ एस्टीम  म्हणजे  थोडक्यात सांगायचे तर, स्वत:ची जाण. आपण स्वत:बद्दल काय विचार करतो ?
आपले गुणदोष आपल्याला समजतात का ? या सर्वांचा परिणाम होतो आपल्या व्यक्तिमत्त्वावर.
ज्यांच्यांत सेल्फएस्टीम  चांगले असते ते एक उत्तम विद्यार्थी बनतात. त्याचे सर्वांशी स्नेहसंबध आणि सर्वं अडचणींवर मात करत ते यशस्वी होतात.
लो सेल्फ एस्टीम
१) आपलेच घोडे दामटणे, इतरांचे ऐकून न घेणे.
२) इतरांच्या भावना समजून न घेणे. त्याची कदर न करणे.
३) कोणत्याही मुद्यावर स्वत:चे मात नसणे. आपले विचार बोलून न दाखवणे. सदैव उदास, नाराज राहणे.
४) आपल्याबद्दल इतर लोक काय म्हणतील याची चिंता करत राहणे.
५) स्वत:तील  दोष वा वाईट सवयी यांचा विचारही न करणे आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न न करणे.
६) नवीन गोष्टी  शिकण्याबाबत उत्साह न दाखवणे .

तुमच्यात आत्मविश्‍वासाची उणीव आहे का?
तुमच्यात आत्मविश्‍वासाची उणीव आहे का?

काय कराल ?
१) सेल्फ टॉक म्हणजे स्वत:शी संवाद साधा.
२) नेहमी सौम्यपणे वा प्रेमळपणे वागा.
३) नकारात्मक गोष्टी विसरून सकारात्मक विचार करा.

परिणाम:
१) स्वत:च्याच नजरेत स्वत:बद्दल चांगुलपणा दिसेल.
२) स्वत:वर प्रेम करायला शिकाल.
३) इतरांना मदत करण्यास तयार व्हाल .
४) स्वत:ची योग्यता आणि क्षमता याबाबत विश्वास बाळगून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल.
५) शाळा, कॉलेज, समाजामध्ये तुमची चांगली प्रतिमा बनेल.
६) मित्रमंडळीत आवडते बनाल.
७) आदर मिळेल .
८) चांगली कामे करण्याची प्रेरणा मिळेल.
९) उत्साही राहाल.
१०) अनुभवी, ज्ञानी, विवेकशील, संवेदनशील लोकांमध्ये मिसळून त्यांच्यापासून काही शिकण्याचा प्रयत्न कराल.
आजच सुरुवात करा
१) ‘ सेल्फ एस्टीम ‘ वाढविण्याचा आजच संकल्प करा.
२) नेहमी नकारात्मक गोष्टी विसरून जा, सोडून द्या. हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
३) सतत काही सकारात्मक काम करत राहा.
हे करा
१) स्वत:वर प्रसन्न राहा. आपले ‘ प्लस पॉइंट ‘ ओळखा.
२) इतरांशी चांगले वागा. स्नेहभाव धरा.
३) नवीन गोष्टी शिकायला तयार राहा. त्यासाठी प्रसंगी धोकाही स्वीकारा.
४) काही चुकले तर त्याचा स्वीकार करायला, ते सुधारायला तत्पर राहा.स्वत:शी प्रामाणिक राहा.
५) आपल्या आदर्शाची जपणूक करा. त्यासाठी प्रसंगी संघर्ष करा.
६) आपल्यात काही  योग्यता आहे, क्षमता आहे यावर विश्वास असू द्या.

Leave a Reply