जागतिक क्रिकेटमध्ये १५ वर्षानंतर होणार ही घटना

मोदी सरकारला न विचारता BCCIने घेतला धाडसी निर्णय

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या कालावधीपासून कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही.

टीम इंडियाने २००८ साली अखेरचा पाकिस्तान दौरा केला होता.

दोन्ही देशातील राजकीय संबंधात तणाव असल्यामुळे द्विपक्षीय मालिका बंद झाल्या आहेत. 

 अशात दोन्ही बाजूच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. 

भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्ष म्हणजेच २०२३ साली पाकिस्तानचा दौरा करू शकते.

 पाकिस्तानला २०२३ च्या आशिया कपचे यजमानपद मिळाले आहे आणि बीसीसीआय या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास तयार आहे.

आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा केंद्र सरकार त्यांना परवानगी देईल. 

भारतीय क्रिकेट बोर्डाने हे स्पष्टपणे सांगितले आहे की आशिया कप २०२३ साठी ते संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास तयार आहे. 

यासाठी बीसीसीआयच्या एजीएमच्या बैठकीत मंजूरी देखील मिळाली आहे.