पृथ्वी शॉ ने केली पुन्हा एकदा हवा! 61 चेंडूत ठोकल्या 134 धावा! 

मुंबईचा भिडू पृथ्वी शॉने पुन्हा एकदा आपल्या बॅटने सतत डावलणाऱ्या निवडसमितीला चोथ प्रत्युत्तर दिले.

पृथ्वी शॉने सईद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत आसामविरूद्धच्या सामन्यात 46 चेंडूत शतक ठोकत सर्वांचे लक्ष पुन्हा आपल्याकडे वेधले.

त्याने सईद मुश्ताक अली ट्रॉफीत आसामविरूद्ध 61 चेंडूत 134 धावांची तुफानी खेळी केली.

पृथ्वी शॉने आपली ही शतकी खेळी 13 चौकार आणि 9 षटकारांनी सजवली.