तो परत आलाय! 4 बॉल 4 विकेट, टीम इंडियाच्या 'या' बॉलरचं जबरदस्त कमबॅक

शमी हा  टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप संघात स्टँड बाय खेळाडूंच्या यादीत होता. पण  ऐनवेळी बुमराला दुखापत झाली आणि त्याच्या जागी 15 सदस्यीय संघात शमीची  वर्णी लागली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातला सराव सामना रोमांचक झाला.  पण अखेरच्या क्षणी रोहित शर्मानं घेतलेला महत्वाचा निर्णय टीम इंडियाच्या  पथ्थ्यावर पडला.

या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ॲरॉन फिंचच्या दमदार अर्धशतकामुळे टीम इंडियाच्या हातून हा सामना निसटतो की काय अशी परिस्थिती होती. 

पण अखेरच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीनं गेम चेंजर ठरला. त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचे 4 बॅट्समन आऊट झाले. त्यामुळे भारतानं कांगारुंना 180 धावातच रोखलं.

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 11 धावा हव्या होत्या. त्यावेळी रोहितनं एक वेगळा डाव खेळला.

प्रॅक्टिस मॅच असल्यानं 15 सदस्यीय संघातील कोणत्याही खेळाडूला मैदानात  उतरवण्याची मुभा होती. त्यामुळे रोहितनं गेल्या आयपीएलपासून एकही टी20  सामना न खेळलेल्या शमीला मैदानात उतरवलं.

आणि शेवटच्या ओव्हरसाठी रोहितनं त्याच्या हाती बॉल सोपवला. शमीनं कॅप्टनचा  विश्वास सार्थ ठरवताना पहिल्या दोन बॉलमध्ये 4 धावा दिल्या.

पण त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर ऑस्ट्रेलियाचे 4 बॅट्समन माघारी परतले आणि टीम इंडियानं हा सामना 6 धावांनी खिशात घातला.

शेवटच्या ओव्हरमध्ये शमीनं 4 धावा देत 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

आयपीएलच्या फायनलमध्ये मोहम्मद शमी शेवटचा टी20 सामना खेळला होता. पण  त्यानंतर आज तब्बल 5 महिन्यांनी शमीनं टी20 सामन्यात बॉलिंग केली. आणि  त्यातही त्यानं जबरदस्त प्रदर्शन केलं.

शमीचं जबरदस्त कमबॅक मुळे हा सामना जिंकता आला