इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग भारतात का नाही?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे. तेथील 85% लोक मुस्लिम आहेत, 2% हिंदू आहेत, तरीही त्यांनी चलनावर गणेशजींचा फोटो लावला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे हे विधान देशाच्या चलनाशी संबंधित आहे. 

भारतीय चलनावर एका बाजूला महात्मा गांधी तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी माता आणि श्री गणपतीचं चित्रं असावं, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

यासाठी सर्व नोटा बदलण्याची गरज नाही, पण नवीन नोटा छापताना त्यावर लक्ष्मीमाता आणि गणपतीचं चित्रं घ्यावं, हे केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

सध्या त्यांचं हे विधान जोरदार चर्चेत आलं आहे. तसंच हे विधान करताना त्यांनी काही उदाहरणंदेखील दिली आहेत.

या मागणीच्या अनुषंगाने दाखला देताना केजरीवाल म्हणाले, इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे. तिथं 85 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे तर हिंदू 2 टक्के आहेत. असं असतानाही तिथल्या चलनावर गणपतीचा फोटो आहे. 

इंडोनेशिया असा निर्णय घेऊ शकतो तर आपण का घेऊ शकत नाही, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.

केजरीवाल म्हणाले, परवा दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी-गणेश पूजन करताना माझ्या मनात हा विचार आला. ही गोष्ट केल्यानं अर्थव्यवस्था सुधारेल असा माझा दावा नाही. परंतु, यामुळे देवाचा आशीर्वाद मिळेल. 

आम्ही कोणताही फोटो हटवण्याची मागणी केलेली नाही. लक्ष्मीमाता ही समृद्धी आणि संपन्नतेची देवता असल्याने माझ्या मनात असा विचार आला. 

मात्र यासाठी सर्व नोटा बदला असं आमचं अजिबात म्हणणं नाही. पण नवीन नोटा छापताना त्यावर लक्ष्मीमाता आणि गणपतीचं चित्रं असावं, असं वाटतं.

देशातील प्रत्येक कुटुंब श्रीमंत व्हावं, यासाठी काही पावलं उचलावी लागतील. जनतेला चांगल्या शाळा, रुग्णालयं आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. 

मात्र, जेव्हा देवी-देवतांचा आशीर्वाद लाभेल, तेव्हाच या गोष्टी शक्य आहेत, असंही केजरीवाल यांनी सांगितलं.

मुस्लिमबहुल इंडोनेशियन नोटांवर लक्ष्मी-गणेश, मग इथं का नाही? केजरीवालांची केंद्राकडे मागणी

दिल्ली महानगरपालिका आणि गुजरातची निवडणूक एकाचवेळी होण्याबाबत केजरीवाल  म्हणाले, ``दिल्लीतील जनता येथे निवडणूक लढवणार आहे तर तिकडे गुजरातची जनता  निवडणूक लढवेल.