तुमचं प्रायव्हेट चॅट कुणी वाचत नाही ना?

आजकाल आपण प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलवर अवलंबून झालो आहोत.

आपण सर्वजण बहुतांश काम ऑनलाइन करतो, त्यामुळं आपली गोपनीयता आणि महत्त्वाचा डेटा धोक्यात आला आहे.

कारण आजकाल सायबर गुन्हे आणि डिजिटल गुन्हे वाढत आहेत.

स्कॅमर लोकांचे मोबाईल हॅक करतात आणि त्यांचा वैयक्तिक डेटा चोरतात. हा  डेटा एकतर ते विकतात किंवा ब्लॅकमेल करून पैसे काढण्यासाठी त्याचा वापर  करतात.

तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही हे तुम्ही कसं शोधू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर अयोग्य किंवा एक्स-रेटेड जाहिरात पॉप अप दिसल्यास तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो. 

तुमची ऑनलाइन ऍक्टिव्हिटी न वाढवता तुमचं डेटाचा नेहमीपेक्षा जास्त वापर होत असेल तर, तुमचा फोन हॅक झाला असण्याची शक्यता आहे 

फोन जसजसा जुना होईल तसतशी तुमच्या फोनची बॅटरी लाइफ कमी होत जाते, परंतु जर बॅटरी खूप वेगानं संपत असेल तर तुम्ही याकडं लक्ष द्यावं.

तुमचा फोन अ‍ॅप्स क्रॅश होणं, स्क्रीन फ्रीज होणं आणि अनपेक्षितपणे रीस्टार्ट होणं असा परफॉर्मन्स दाखवत असेल तर समजून जा तूच फोन हॅक झाला आहे. 

तुमच्‍या सोशल मीडियावर किंवा तुमच्‍या फोनशी लिंक असलेल्‍या ईमेल खात्‍यांवर तुमच्‍या अपरिचित घडामोडी घडत असल्‍यास, याचा अर्थ हॅकरने डिव्‍हाइसमध्‍ये प्रवेश मिळवला आहे.

फोन हॅक झाल्यास अज्ञात एप्लिकेशन ताबडतोब डिलीट करा. अँटी मालवेअर एप्लिकेशन चालवा.

तुमचा फोन रिसेट करणं हा मालवेअरपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आपला पासवर्ड सतत बदलत रहा.

तुमच्या संपर्क यादीतील लोकांना सूचित करा, तुमचा फोन हॅकर्सपासून वाचवण्यासाठी अनरूट करा.