नेटफ्लिक्स युजर्ससाठी आनंदाची बातमी! २० ते ६० टक्क्यांनी कमी केले सबस्क्रिप्शन रेट..

टेक्नॉलॉजी

जगभरात सध्या नेटफ्लिक्स हा सर्वात लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म बनला आहे. विविध विषयांच्या वेबसीरिज, मूव्हीज, डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी जगातील नागरिक नेटफ्लिक्सला पसंती देत आहेत. सध्या बहुतेक जण मोबाईलवर वेबसीरिज, मूव्हीज, डॉक्युमेंट्री पाहत बसतात त्यामुळे नेटफ्लिक्सने आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

११६ देशामध्ये सबस्क्रिप्शन प्राईज कमी करण्याचा निर्णय

नेटफ्लिक्सने बुधवारी जाहीर केले की, भारतातील व्यवसाय धोरणाच्या यशानंतर कंपनीने ११६ देशांमध्ये सबस्क्रिप्शन प्राईज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सने २०२१ मध्ये भारतात सर्वात कमी किंमतीचे सबस्क्रिप्शन पॅकेज सादर केले होते. तेव्हापासून भारतात ग्राहकांच्या सहभागामध्ये तब्बल ३० टक्के आणि एकूण उत्पन्नात एका वर्षांत २४ टक्के वाढ झाली आहे. ‘डीएनए’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे नागरिकांना नेटफ्लिक्सच्या या निर्णयामुळे चांगला लाभ मिळणार आहे.

netflix

सबस्क्रिप्शन फी २० ते ६० टक्क्यांनी कमी

मीडियाच्या माहितीनुसार, कॉर्पोरेशनने भारतीय बाजारपेठ अधिक अनुकूल करण्यासाठी आणि युजर्सची संख्या वाढवण्यासाठी सबस्क्रिप्शन फी २० ते ६० टक्क्यांनी कमी केली आहे. कंपनीचे को-चीफ एक्झिक्युटिव्ह टेड सॅरंडोस यांनी अर्निंग्ज कॉलदरम्यान सांगितले की, “भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे कारण येथे मनोरंजनप्रेमी नागरिकांची लोकसंख्या प्रचंड आहे. त्यांना आवडणारे प्रॉडक्ट आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

म्हणून, आम्ही सर्जनशीलतेचा वापर करत आहोत आणि युजर्सना अधिक चांगली सबस्क्रिप्शन किंमत देण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतात सतत प्रगती करत राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. युजर्सना लोकल कंटेंट जास्त आवडत असल्याने भारत ही एक अतिशय विशिष्ट बाजारपेठ आहे. शिवाय, आपण पहात आहात की येथील लोकल कंटेंट नेहमीपेक्षा जास्त प्रसिद्ध होत आहे.” त्यामुळे सबस्क्रिप्शन फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सॅरंडोस यांचे महत्वाचे निरीक्षण

सॅरंडोस यांनी ऐतिहासिक चित्रपट ‘आरआरआर’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’च्या यशाचा उल्लेख केला. हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये रिलिझ झाल्यानंतर स्ट्रीम करण्यात आले होते. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या क्षमतेसोबत कंटेंटची संधी अजूनही वाढत आहे, हे यातून दिसून येते.

सॅरंडोस यांनी पुढे सांगितले कि “आम्ही भारतात चांगली कामगिरी करू शकतो. सध्या आम्ही त्यापासून खूप लांब आहोत. त्यामुळे आम्ही अजून जास्त गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटते की, आम्ही भारतात नक्कीच चांगली कामगिरी करू,” असेही सॅरंडोस पुढे म्हणाले.

राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे कुटुंब अतिरिक्त खर्चांमध्ये कपात करत आहेत. शिवाय, नेटफ्लिक्सला आपल्या प्रतिस्पर्धी सेवांकडून अधिक स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. आर्थिक वर्ष २०२२ साठी ओव्हर-द-टॉप प्लेअर्सच्या एकूण कमाईपैकी ५ टक्के पेक्षा कमी कमाई ज्या देशांतून आली त्या ठिकाणी किमती कमी करण्यात आल्या आहेत.

नेटफ्लिक्सचे नवीन दर जाणून घ्या

नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन पूर्वी १९९ प्रतिमहिना किंमत असलेला आता केवळ १४९ रुपयांना मिळत आहे. तर, मोबाईल वगळता इतर कोणत्याही एका डिव्हाइसवर सर्व चालणाऱ्या बेसिक सबस्क्रिप्शनची किंमत ४९९ ऐवजी १९९ करण्यात आली आहे. आशिया, युरोप, लॅटिन अमेरिका, सब-सहारा प्रदेशातील आफ्रिकन देश आणि मध्य पूर्वेतील काही भागांमध्ये या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी नेटफ्लिक्सच्या उत्पन्नात घट दिसून आली

मार्च २०२३ मध्ये संपलेल्या तीन महिन्यांत, नेटफ्लिक्सचे जागतिक निव्वळ उत्पन्न मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळजवळ १८ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यात १ हजार ३०५ दशलक्ष डॉलर्सची (सुमारे १०७ कोटी) एवढी घट झाली आहे. असे असले तरी, नेटफ्लिक्सचा महसूल मार्च २०२२ च्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षीच्या तिमाहीत ३.७ टक्क्यांनी वाढून ८ हजार १६२ दशलक्ष डॉलर्सवर (अंदाजे ६७१ कोटी रुपये) पोहोचला आहे. पण आता सबस्क्रिप्शन फी कमी करण्यात आल्याने भारतातील बाजारपेठ अजून अनुकूल होऊन युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.

हे हि वाचा : क्रिकेट व्यतिरिक्त या माध्यमातून सचिन तेंडुलकरची आर्थिक कमाई! या कंपन्यांचा सचिन तेंडुलकर आहे मालक..घ्या जाणून

Follow Us on Facebook