व्हॉट्सअँपने युजर्ससाठी आणले झक्कास फिचर, आता १ अकाऊंट ४ मोबाईलमध्ये वापरता येणार!
सध्या जगभरात बहुतांश जणांकडे मोबाईलमध्ये व्हॉट्सअँप इन्स्टॉल केलेले असते. यामुळे आपण ओळखीच्या व्यक्तीशी तसेच इतरांशी कनेक्ट राहण्यास मदत मिळते. व्हॉट्सअँपकडून युजर्सना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्यासाठी कायमच प्रयत्न केले जातात. यात युजर्ससाठी लय भारी फिचर्सही आणले जातात. पण यावेळी व्हॉट्सअँपने युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणले आहे. हे नवीन अपडेट अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी आहे. या नवीन अपडेटची व्हॉट्सअँप (WhatsApp Update) युजर्सही अतुरतेने वाट पाहत असतात. या नवीन अपडेटनुसार, आता १ व्हॉट्सअँप अकाऊंट ४ मोबाईल डिव्हाईसेसला कनेक्ट करता येणार आहे. याआधी व्हॉट्सअँप अकाऊंट कम्प्युटर आणि लॅपटॉपसारख्या डिव्हाईसेसवर वापर केले जात होते. पण स्मार्टफोन्सवर वापरता येते नव्हते. परंतु, आता व्हॉट्सअँपने युजर्ससाठी एक नवीन फीचर युजर्ससाठी घेऊन आले आहे. या फीचरचा कसा वापर करायचा? हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया.
व्हॉट्सअँपच्या नवीन फीचरमुळे कसा फायदा होईल?
याआधी युजर्सना १ मोबाईलमध्ये १ व्हॉट्सअँप अकाऊंट वापरता येत होते. आता नवीन अपडेटनुसार १ व्हॉट्सअँप अकाऊंट ४ मोबाईल डिव्हाईसेसमध्ये वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा वापर केल्यामुळे साईन आऊट करण्याची आवश्यकता नाही. तसेच नवीन मोबाईलमध्ये व्हॉट्सअँप ओपन केल्यामुळे तुमची व्हॉट्सअँप चॅटही डिलिट होणार नाही. त्यामुळे युजर्सना हे नवीन फीचर प्रचंड पसंदीस पडणार आहे. परंतु हे नवीन फिचर छोट्या व्यावसायिकांसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे. या नवीन फीचरमुळे एकाच WhatsApp Business अकाऊंटवरुन कोणत्याही ग्राहकांशी संवाद साधता येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना हे फीचर जास्त पसंतीस उतरणार आहे.
एक व्हॉट्सअँप अकाऊंट ४ मोबाईलमध्ये कसे वापरणार?
व्हॉट्सअँपच्या नवीन फिचरमुळे जास्तीत ४ मोबाईल डिव्हाईसेसमध्ये कनेक्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी व्हॉट्सअँप लिंक करण्याची प्रोसेस नेहमीसारखीच असणार आहे. तुम्ही कम्प्युटरच्या डेस्कटॉपवर ज्याप्रमाणे व्हॉट्सअँप लिंक करता त्याचप्रमाणे लिंक करायचे आहे. लिंक करण्याची प्रोसेस खालील प्रमाणे आपण आज जाणून घेऊयात.
१) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअँप अकाऊंट ओपन करा.
२) More Options > लिंक्ड डिव्हाईसवर क्लिक करा.
३) यानंतर Link a device वर लिंक करा.
४) तुमचा फोन अनलॉक करा.
५) तुमच्या मोबाईल दुसऱ्या डिव्हाईसच्या स्क्रिनसमोर पकडून क्यूआर कोड स्कॅन करा आणि तुमचे व्हॉट्सअँप लिंक होईल.
६) यानंतर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअँप खाते दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपन होईल.
या सहा स्टेप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअँप खाते इतर मोबाईल फोन्समध्ये वापरता करण्याची सुविधा मिळणार आहे.
हे हि वाचा : पेट्रोल पंपावर तुम्हाला या ६ सुविधा मिळतात मोफत! तुम्हाला या सुविधा माहिती आहेत का?
Follow Us on Facebook