Essel Energy GET 1: ८० रुपयांत ८०० किमी धावणार ही E-Bike ड्रायविंग लायसन्स व रजिस्ट्रेशन ची गरज नाही.

कार-बाइक

Essel Energy GET 1: पेट्रोल च्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रीक दुचाकींची मागणी सातत्यानं वाढत आहे. सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका इलेक्ट्रीक बाईक बद्दल सांगणार आहोत जी चालवण्यासाठी तुम्हाला ना ड्रायव्हिंग लायसन्सची गरज आहे ना रजिस्ट्रेशनची गरज आहे. या बाईक ची किंमत हि खूप कमी आहे.

Essel Energy GET 1

एस्सेल एनर्जी कंपनी आपल्यासाठी घेऊन आली आहे प्रसिद्ध मॉडेल GET 1 या बाईक मध्ये चांगली स्पेस देण्यात आली असून फूटबोर्ड आणि स्टोरेज स्पेसही देण्यात आली आहे. 16Ah बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत 43,500 रुपये आणि 13Ah बॅटरी पॅक व्हेरिएंटची किंमत 41,500 रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की Essel Energy GET 1 एका चार्जवर 50 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते.

कंपनी आपल्या बॅटरीसह 2 वर्षांची वॉरंटी आणि इलेक्ट्रीक कंपोनंट्ससाठी 1 वर्षाची वॉरंटी देत ​​आहे. हि बाईक ताशी 25 किलोमीटर स्पीड ने धावते. या बाईकची रनिंग कॉस्ट 10 पैसे प्रति किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. म्हणजेच 1 रुपयांचा 10 किमी आणि 80 रुपयांत तुम्ही 800 किमीचा प्रवास करून शकता.

Force Motors 10 Seater Car: या कंपनीनं आणली 10 सीटर कार! लुक असा की विसरून जाल सर्व कार