क्रिकेट व्यतिरिक्त या माध्यमातून सचिन तेंडुलकरची आर्थिक कमाई! या कंपन्यांचा सचिन तेंडुलकर आहे मालक..घ्या जाणून

क्रीडा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकच्या वयाचे अर्धशतक पूर्ण

नुकताच महान क्रिकटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा ५० वा वाढदिवस झाला, जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणारा महान क्रिकटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने नुकतीच त्याच्या वयाची हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केले आहेत. यामध्ये जगात सर्वाधिक १०० शतके करण्याच्या अनोख्या विक्रमाचाही समावेश आहे. तसेच सर्वाधिक एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्याच नावावर आहे. २४ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर सचिनने नोव्हेंबर २०१३ निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतरही त्याने क्रिकेटशी नाते जोडून ठेवले आहे. ते आजही अबाधित आहे. यावर्षी फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर ५१ व्या क्रमांकावर होता.

sachin tendulkar property

फक्त क्रिकेट नव्हते तर इतर माध्यमातून आर्थिक कमाई

सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेटच नव्हे तर अन्य माध्यमातूनही आर्थिक कमाई करतो. सचिन प्रीमियम बॅंडमिंटन लीग, इंडियन सुपर लीगची फ्रेंजायची असून केरळ ब्लास्टर्स आणि बंगलोर ब्लास्टर्स या संघाचा मालकही आहे. याशिवाय सचिन तेंडुलकरकडे मुंबईच्या संघाची फ्रेंजायजी आहे. तसेच हॉटेल्स आणि इतर कंपन्यात केलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून कमाई सुरु असते.

सचिन तेंडुलकरची कोणकोणत्या कंपन्यात गुंतवणूक आहे?

सचिन तेंडुलकरने क्रिकेट व्यतिरिक्त कमाईचे काही स्त्रोत निर्माण केले आहेत. सचिन तेंडुलकर हा दोन रेस्टॉरंचा मालक असून मुंबई आणि बंगलोरमध्ये हे रेस्टॉरंट सुरु असल्याचे समजते. या रेस्टॉरंटला सचिन तेंडुलकरचेही नावही देण्यात आलं आहे. या रेस्टॉरंटला Sachin’s and Tendulkar’s असे नाव दिले आहे. सचिन तेंडुलकरची ७० टक्के कमाई हॉटेल आणि फ्रेंजायजीच्या माध्यमातून केली आहे, असा अंदाज आहे.

सचिन तेंडुलकर या कंपन्यांचा मालक आहे

सचिन तेंडुलकरने अनेक स्टार्टअप कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. यामध्ये स्मार्ट्रोन इंडिया, जेटसिंथेसिस, एस. ड्राईव्ह, सच आणि स्पिनी यासारख्या स्टार्टअप कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय २०१६ मध्ये अरविंद फॅशन लिमिटेड या कंपनीसोबत ट्रू ब्लू नावाची एक मेंस वेअर कंपनी सुरुवात केली आहे. यानंतर सचिनने त्याची पत्नी अंजली तेंडुलकरसोबत SRT स्पोर्ट मॅनेजमेंट नावाची कंपनी सुरु केली. या कंपन्याच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरची कमाई आहे.

सचिन तेंडुलकरची एकूण किती संपत्ती आहे?

सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती १४०० कोटीच्या जवळपास म्हटले जाते. पण सध्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा समावेश असून संपत्तीच्या बाबतीत सचिनच पुढे आहे. सचिन तेंडुलकर त्याच्या जाहिराती आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून महिन्याला जवळजवळ ५० कोटी रुपयांची कमाई करत आहे.

हे हि वाचा : पेट्रोल पंपावर तुम्हाला या ६ सुविधा मिळतात मोफत! तुम्हाला या सुविधा माहिती आहेत का?

Follow Us on Facebook