आनंदी आणि उत्साही दिवसाच्या सुरवातीसाठी

लाइफस्टाइल

सकाळी उठल्यावर प्रत्येकाला दिवसभर वाढून ठेवलेली कामे दिसू लागतात आणि मग ती पूर्ण करण्याची धावपळ तिथूनच सुरु होते.
अशा स्थितीत तुम्ही कामाला सुरुवात करण्यापूर्वीच तुमच्यातील आनंद आणी उत्साह मावळलेला असतो. सगळ्या कामांची डेडलाईन गाठण्यासाठी तुमची शर्यत सुरु झालेली असते.  सकाळची सुरुवात उत्साहाने होण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे उद्याच्या कामाचे नियोजन आदल्या रात्रीच करून ठेवा.  संध्याकाळी हलके जेवण आणी ते देखील ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान आणी नंतर १ ते २  तासांनी झोप .
झोपण्यापूर्वी थोडा वेळ ध्यानधारणा करा. त्यानंतर दिवसभरातील घटना डोळ्यासमोर आणा. मग मन स्वस्थचित करा आणी पुढील विचार मनात आणा . तुमच्यामध्ये ती ताकद आहे : स्वत:ला पुन्हा एकदा सांगा कि निसर्गातील सर्वात उत्तम निर्मिती म्हणजे तुम्ही स्वत: आहात. कारण तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा मोठे आव्हान कधीच स्वीकारलेले नसते. अडचणींचा विचार करू नका : तुम्ही स्वत:लाच वाचन दिले पाहिजे कि, कितीही अडचणी निर्माण झाल्या, संकटे आली तरी देखील त्यावर मत करून हरी घेतलेले काम पूर्ण करणारच .
हा अगदी साधा सरळ आणी प्रामाणिक मार्ग आहे. तो तुम्हाला इच्छित स्थळी  घेऊन जाईल .
त्यासाठी पुढील सहा गोष्टीचा विचार करा.

आनंदी आणि उत्साही दिवसाच्या सुरवातीसाठी
आनंदी आणि उत्साही दिवसाच्या सुरवातीसाठी
  • व्यायाम : अगदी दहा मिनिटांचे चालणे देखील तुमचा उत्साह वाढवते आणी तुमचा मूड बदलून टाकते .
  • संगीत ऐका : चालताना, ऑफिसमध्ये, घरात संगीत ऐका . संगीत हे मनाची घडी नित बसवण्याचे चांगले साधन आहे .
  • पुरेशी झोप घ्या : तुम्ही गाढ झोपेत असताना रोज अलार्म  वाजत असेल तर समजा कि तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. त्यासाठी रात्री लवकर झोपण्याची सवय लावून घ्या. अलार्म होण्या अगोदरच चार- पाच मिनिटे जग यायला हवी.
  • डुलकी : काही जणांना दुपारी दहा- पंधरा मिनिटांची डुलकी तरतरी देऊन जाते. पण अशी डुलकी पंधरा मिनिटांपेक्षा जास्त असू नये. पंधरा मिनिटात लगेच कामाला लागले पाहिजे.
  • उत्साही वावर : तुमचा वावरण्यातील उत्साहाचे प्रमाण वाढले तर आपोआप आनंदाचे प्रमाण वाढेल. तुम्ही कामात, वागण्यात झपाटा दाखवला तर शरीरातील मेट्याबोलिझमही वेग पकडते. त्याचबरोबर उत्साहपूर्ण वागण्यामुळे तुमच्यात नव्या उर्जेचा संचार झाल्याचा अनुभव तुम्हाला येतो.
  •  मित्रांशी गप्पा मारा : तुम्हाला जर निराशेचा, नाराजीचा अनुभव येत असेल तर मित्र- मैत्रिणींशी गप्पा मारा. अशा गप्पांमुळे तुम्हाला उत्साही आणी आनंदी वाटू लागेल .

Leave a Reply