“या” तारखे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट ( Aadhaar Card Update ) करा, नाहीतर अनुदानापासून राहणार वंचित

महाराष्ट्र

३० एप्रिल पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करा

राज्यातील नव्याने अनुदानावर ( Grant ) येणाऱ्या शाळा ( School ) आणि महाविद्यालयांना ( College ) वेतन अनुदानासाठी संच मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट ( Aadhaar Card Update ) करणे आवश्यक असून, त्यानुसारच या विद्यार्थ्यांना (Students) अनुदान दिले जाणार आहे.

बीड जिल्ह्यात २८६ शाळा अनुदानासाठी पात्र

Beed बीड जिल्ह्यामध्ये ( Beed District ) २० टक्के अनुदानाच्या कक्षेत ८४ शाळा तर ४० टक्के अनुदानाच्या कक्षेत ४६ आणि ६० टक्के अनुदानाच्या कक्षेत १५६ शाळा असून या ठिकाणी कार्यरत शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी संच मान्यता गरजेची आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना ( Students ) दिला जातो त्यांचे आधार कार्ड ( Aadhaar Card Update ) अपडेट करणे बंधनकारक आहे. त्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. तसेच आधार कार्ड अपडेट न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे अनुदान मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर अनुदानास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश ( School Uniform ), शालेय पोषण आहार त्याचबरोबर मोफत पाठ्यपुस्तक आणि इतर शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळे आधार कार्ड ३० एप्रिलपर्यंत अपडेट करणे गरजेचे आहे, आधार कार्ड अपडेट नाही केल्यास विद्यार्थी अनुदानास अपात्र ठरणार आहेत.

aadhaar card update

बीड जिल्ह्यातील पात्र शाळा-महाविद्यालयांना किती अनुदान!

२० टक्के अनुदान : २० टक्के अनुदानाच्या कक्षेत जिल्ह्यातील १० शाळा आहेत. इयत्ता पाचवी ते सातवीचे २० वर्ग, तर ५४ तुकड्यांना हे अनुदान मंजूर आहे.

४० टक्के अनुदान : ४० टक्के अनुदानाच्या कक्षेत जिल्ह्यातील ९ शाळांचा समावेश आहे. इयत्ता पाचवी ते सातवीचे २३ वर्ग आणि १४ तुकड्यांना मान्यता देण्यात आली आहे.

६० टक्के अनुदान : ६० टक्के अनुदानाच्या कक्षेत जिल्ह्यातील ८२ शाळांच्या १५६ वर्ग आणि तुकड्यांचा ६० टक्के अनुदानासाठी पात्र ठरल्याचे सांगण्यात आले.

पात्र विद्यार्थ्यांनी आधार नंबर जोडणे बंधनकारक, अन्यथा लाभ मिळणार नाही..

राज्य शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना दिला जातो, त्यांचे आधार कार्ड जोडणे बंधनकार आहे. ज्यात शालेय गणवेश, शालेय पोषण आहार योजना, मोफत पाठ्यपुस्तके आणि इतर शासकीय लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता यावी म्हणून विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. हे काम १०० टक्के झाल्याशिवाय शाळांना अनुदान मिळणार नाही. त्याचबरोबर संच मान्यतेला अंतिम मंजुरी मिळू शकणार नाही. त्यामुळे आधार कार्ड ३० एप्रिलपर्यंत अपडेट करण्यासाठी पालक आणि शिक्षकांकडून प्रयत्न केले जात आहेत.

हे हि वाचा : महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त; गहू, ज्वारी, बाजरीचे दर कडाडले, डाळी महागल्या.

Follow Us on Facebook