महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त; गहू, ज्वारी, बाजरीचे दर कडाडले, डाळी महागल्या..
गृहिणींचे किचनचे बजेट कोलमडले
महाराष्ट्रा राज्यात महागाईने ( Inflation ) उच्चांक गाठला आहे. राज्यातील किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू ( Wheat ), ज्वारी ( Jowar ), बाजरीचा ( Bajri ) किलो ५० रुपयांपेक्षा जास्त भाव झाला आहे. तयार उडीद डाळ, मुग डाळ, तूर डाळ होलसेल मार्केटमध्येच १०० ते १५० रुपयांचा दर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातील महिला भागिनींचे किचनछे बजेट सर्व बिघडलं आहे. सर्वसामान्यांच्या ताटातले जवळपास सर्वच पदार्थ महागल्यामुळे घराचा गाडा चालवताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत.
अवकाळी पावसाचा धान्य उत्पादनाला फटका बसला
महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका धान्य उत्पादनाला बसला आहे. गहू, ज्वारी, बाजरी, डाळी, कडधान्यांच्या किंमती चांगल्याच कडाडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्वारीचे दर २२ ते २९ रुपयांवरुन थेट २८ ते ५० रुपयांवर गेले आहेत. गहू देखील किरकोळ बाजारात ४० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत दर वाढला आहे.
सध्याचे बाजारातील धान्यांचे दर काय आहेत, ते सविस्तर…
धान्य दर (प्रति किलो)
शेंगदाणे १४० ते १७० रुपये
गहू ३६ ते ३८ रुपये
ज्वारी ५२ ते ७० रुपये
बाजरी ४० ते ४४ रुपये
तूर डाळ १३० ते १५० रुपये
मूग डाळ १२० ते १३० रुपये
उडीद डाळ १२० ते १४० रुपये
मूग ११० ते १३० रुपये
मटकी १२० ते १६० रुपये
अवकाळी पाऊस पण सरकारकडून अद्याप मदत नाही
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान्यांच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. inflation राज्यात बहुतेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने मेहनतीने पिकवलेल्या बळीराज़ाचे मोठे नुकसान झाले आहे. पण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप सरकारकडून मदत मिळालेली नाही. मात्र, शेतीचे नुकसान झाल्याने उभ्या जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा मात्र सध्या आर्थिक संकटात सापडला आहे.
सर्व सामान्यांना महागाईचा भडका
गहू, ज्वारी, मका, केळी, द्राक्ष, संत्री यांचे जास्त नुकसान अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झाले आहे. ज्वारीचे दर २२ ते २९ रुपयांवरुन थेट २८ ते ५० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू ने देखील ४० ते ५० रुपये दर गाठला आहे, तर ज्वारी, बाजरी ५० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना inflation महागाईला सामोरे जावे लागणार हे नक्की.
राज्यात पुन्हा अवकाळीचा हवामान खात्याचा इशारा
राज्यातील वातावरणात सतत बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागाने (Meteorological Department) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (Rain) इशारा दिला आहे. ७ एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
राज्यात अचानक पावसाची स्थिती का निर्माण झाली?
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाली पावसाचा इशारा दिला आहे. अचानक अशी स्थिती का निर्माण झाली, यासंदर्भात हवामान अभ्यासक मयूरेश प्रभुणे यांनी एका खाजगी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तामिळडूपर्यंत होत आहे. त्यामुळे या भागात द्रोणीय स्थिती म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या भागात बाष्प जमा होत आहे. तर दुसरीकडे तापमानही वाढत आहे. साधारणत ३५५ अंशाच्या आसपास तापमान आहे. त्यामुळे या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याची माहिती हवामान अभ्यासक मयूरेश प्रभुणे यांनी दिली. ७ एप्रिल पर्यंत राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे हि वाचा: ८० रुपयांत ८०० किमी धावणार ही E-Bike ड्रायविंग लायसन्स व रजिस्ट्रेशन ची गरज नाही.
Follow Us on Facebook