जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली, ७ ते ८ जणांचा मृत्यू, तात्काळ मदतीला सुरुवात
शनिवारी सकाळ अपघाताच्या बातमीने होत आहे, एका भीषण अपघाताची घटना नुकतीच समोर आली आहे. यात जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये ४० ते ४५ प्रवासी असून यातील ७ ते ८ प्रवासी मृत झाल्याचे आणि २० ते २५ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तात्काळ मदतकार्याला सुरुवात
अपघातग्रस्त ठिकाणी तात्काळ मदतकार्य सुरू असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. स्पॅाटवर अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आलेले आहे. खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून ते गोरेगाव येथे जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
अद्याप १५ ते २० प्रवासी अडकल्याची भीती
हि खाजगी बस पुण्याहून मुंबईला निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आतापर्यंत २५ जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलेले आहे. आणखी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तरीही १५ ते २० प्रवासी दरीत अडकल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बसमध्ये एकूण ४० ते ४५ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर या अपघातात ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
खासगी बसमध्ये गोरेगाव मधील बाजीप्रभु वादक गट (झांज पथक)
खासगी बसमध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात असताना ही घटना घडली आहे. ही बस ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्या ठिकाणी मदतकार्य सुरु असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली आहे. खासगी रुग्णालयातील डॅाक्टर्संना देखील मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. आणखी प्रवासी बसमध्ये अडकलेले आहेत. बचावपथकांकडून युद्धपातळीवर कार्य सुरू आहे
हे हि वाचा : रमजानची जकात वाटताना यमनच्या राजधानीत मोठी चेंगराचेंगरी; चेंगराचेंगरीत ८५ नागरिकांचा मृत्यू, जकात म्हणजे काय?
Follow Us on Facebook