आपल्या व्यक्तिमत्त्वात असा बदल करा

लाइफस्टाइल

साधारणपणे आपण आपल्या बोलीभाषेत देहाभिमानाचा किंवा अहंकाराचा अर्थ घमेंड असा लावतो, पण देहाभिमानाचा वास्तविक अर्थ असा आहे कि , स्वत:ला आणि स्वत:चा अभिमान ओळखणे आणि त्याला सतत आपल्या स्वभावात द्विगुणीत करणे .
साधारणपणे देहाभिमानाच्या स्तराला किंवा अहंकाराच्या स्तराला चार भागात विभाजित केले जाते. स्तर क्रमांक एकमध्ये आपण आपल्या व्यक्तीमत्त्वाला ओळखले पाहिजे कि, आपला अहंकार कोणत्या स्तरात मोडतो.

आपल्यात व्यक्तिमत्त्वात असा बदल करा
आपल्यात व्यक्तिमत्त्वात असा बदल करा

पहिल्या स्तरातील व्यक्ती स्वत:ला आणि दुसरयाला व्यवस्थित समजून घेतात. यातील व्यक्ती सकारात्मक विचारांच्या असतात. त्यांची बुद्धी लवचिक आणि समजूतदारीचीअसते. हे दुसरयाचे विचार ऐकण्याची मानसिकता ठेवतात.
 सतत दुसरयाकडून शिकण्याची इच्छा ठेवतात. ते सतत शिकत राहातात आणि आपली प्रगतीही करून घेत असतात.
अशा व्यक्तीला आपल्यापेक्षा वरिष्ट आणि कनिष्ट व्यक्तीबद्दल कसलीच तक्रार नसते. तो आपसातील संबंध मजबूत करत असतो.
दुसरया क्रमांकाच्या स्तरावर अशा व्यक्ती येतात कि मी ठीक आहे तू ठीक नाहीस अशा प्रवृत्तीच्या असतात
अशा व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती जास्त अहंकारी असते. ती स्वत:वर ताकदीपेक्षा जास्त विश्वास ठेवत असते. या प्रकारची माणसे दुसऱ्यांचे विचार ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात.
आपल्या मुद्यावरअडून राहण्याची त्यांची प्रवृत्ती असते. या कधीच दुसरयाकडून शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत.
ते खुल्या विचाराचेही नसतात. ते कधीच दुसरयाचे ऐकणे पसंत करत नाहीत. यामुळे त्यांचा विकास किंवा  प्रगती मंद गतीने होतो.
तिसरया स्तरांची माणसं स्वत:ला कमी लेखतात आणि दुसरयाला चांगले मानतात. या प्रकारात मोडणारी व्यक्ती स्वत:ला हीन मानते.
मी प्रत्येक ठिकाणी चूक करतो दुसरा प्रत्येक ठिकाणी बरोबर असतो अशा मानसिकतेत हा माणूस जगतो यामुळे तो जन्मभर आपल्या चुकांमुळे व वाईट स्थितीमुळे अनेक वेळा अयशस्वी बनतो.
याच कारणामुळे कोणत्याही कामाची जोखीम उचलण्याची क्षमता त्यात असत नाही, तो सदैव सुरक्षित राहून चालण्याचा प्रयत्न करत असतो आणि दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवतात.
दुसरा सदैव योग्य आहे यावर ठाम राहून आपले आयुष्याचे वाटोळे करून घेतो. दुसरे लोक त्याच्या या स्वभावाचा लाभ घेतात.
चौथ्या क्रमांकाची ब्याक्ती सर्व जगाला चूक ठरवत असते.. मीही चूक करणारा आणि दुसराही चूक करणारा आहे असा तो मानतो.
 अशा व्यक्ती जास्त काळापर्यंत निराशावादी राहातात. ते विचार करतात कि जे चालत आहे ते चालू देत.
असे लोक आपल्या प्रगतीचे रस्ते स्वत: बंद करून घेतात. आपल्या देहाभिमानाचा स्तर कोणत्या क्रमात येतो.
हे ठरवण्याची जबाबदारी आपली असते. आपला क्रम अनेक गोष्टीवर अवलंबून असतो . त्या गोष्टी म्हणजे, तुम्हाला लहानपणापासून कोणत्या प्रकारचे शिक्षण मिळाले?
आपले शिक्षक कसे होते ? आपल्या घरातील वातावरण कसे होते ? आपल्या घरातील वातावरण कसे होते ? तुम्ही कोण-कोणत्या प्रसंगातून मार्ग काढला आहे ?
या गोष्टी लक्षात ठेवा
सर्वात आधी  आपल्या उणीवा ओळख. त्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करा
चारित्र्यसंपन्न  व्यक्तीसोबत पाला परिचय वाढवा.
आपली आतंरिक शक्ती ओळख आणि दुसरा आपल्याबद्दल काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करा.
सर्वाच्या हिताची अपेक्षा बाळगा आणि मनापसून त्याची प्रशंसा करा.
सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारा
आपल्यापेक्षा गरीब लोकांची जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करावा.
आपल्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास जागा ठेवा .

Leave a Reply