मुले सुसंस्कृत होण्यासाठी हे टाळा
घरांमध्ये मुलांचा वेळ टीव्ही बघण्यात जातो. टीव्हीचा मुलांच्या मनावर व शरीरावर घटक परिणाम होत आहे. सतत टीव्ही पाहण्यामुळे डोळेही खराब होतात व टीव्हीवरील सिरियलमध्ये दाखविल्या जाणाऱ्या हिंसा व अश्लीलतेने भरलेल्या कथानकांमधून त्यांच्या कोमल वाईट संस्कार होत आहेत. बदलते जग व वातावरण यांचा परिणाम मुलांच्यावर पडणे स्वाभाविकच आहे. जन्मापासून किशोरवयापर्यंत मुले मातापित्यांच्या छत्रछायेखाली वाढत असतात. समाजाशी त्यांचा संपर्क त्यानंतर येतो. असे म्हटले जाते कि, मत हि मुलाची प्रथम गुरु आहे. परंतु तसे पहिले तर प्रत्येक मुल हे घरातील सर्व व्यक्तींकडून काही ना काही तरी अवश्य शिकत असते. घरातील प्रत्येक व्यक्तीचे वागणे बोलणे व कृती यातून मुलांच्या मनवर प्रभाव पडत असतो. मुले बघतात, ऐकतात. त्याचेच ती अनुकरण करू पाहतात.
आज परिस्थिती अशी बनली आहे कि, आईबापांनी मुलांना काही सल्ला दिला तर तो त्यांना आवडत नाही. तुम्ही मुलांकडून आपल्या अपेक्षा जाहीर करू शकता; परंतु त्यासाठी त्यांच्यावर लाडू शकत नाही. आजचे मातापिता दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे पित्याला दिवसभर मुलांकडे बघायला वेळ नसतो व आईला नोकरीनंतर आपला क्लब पार्ट्या नाहीतर समाजसेवा प्रिया असते. मुले त्यामुळे प्रत्येक सुखसुविधा मिळूनही आत्मकेंद्रित बनू लागली आहेत.
त्यांच्या एकटेपणात कोणी साथीदारच त्यांना घरात लाभत नाही. परिणामी टीव्ही व कॉम्पुटर व बाहेर मित्र हेच त्यांचे जग बनू लागले आहे. त्यामुळेच हळूहळू घर त्यांना अप्रिय वाटू लागते. पण त्यासाठी जबाबदार कोण? बऱ्याच घरात मातापित्यांची भांडणे होतात. या भांडणात त्यांच्याकडून एकमेकांविषयी अपशब्दही उच्चारले जातात. यामुळे मुलांच्या कोवळ्या मनावर वाईट परिणाम होतो. घरातल्या या वादग्रस्त वातावरणामुळे त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो व त्यातून ती मोठी झाल्यावर चुकीच्या मार्गाला वळू शकतात. त्यांना यामुळे मातापिता, समाज व घराविषयी आदर, आस्था राहत नाही व नात्यांचे अप्रूप वाटत नाही. त्यांचा स्वभावही उग्र बनू लागतो.
मुलांना योग्य दिशा देण्यासाठी पालकांनी त्यांच्यासाठी वेळ खर्च करणे व त्यांचे मन जाणून घेणे आवश्यक आहे. मुलांना उठता बसता हिडीस फिडीस केल्यानेही ती बिघडतात. याऐवजी त्यांच्या वागण्याकडे पालकांनी बारकाईने दृष्टी ठेवावी व ती चुकली तर त्यांना मायेने जवळ घेवून त्या वागण्याचे दुष्परिणाम समजून सांगावे. मातापित्यांचा जास्त सहवास लाभला, तर मुलेही त्यांना मोकळेपणाने आपल्या अडचणी सांगू शकतात. वाढत्या वयाच्या मुलांचे खरे मित्र बनण्यामुळे त्यांचा उत्तम विकास होऊ शकतो.