आज जीवनातील प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस

लाइफस्टाइल

सकाळी जग येताच म्हणा, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजचा दिवस परमेश्वराने मला माझी क्षमता शाबीत करण्यासाठी दिला आहे. आज संधी येईल आणि मी तिचे सोने करीन.
 आज ‘ सकारात्मक विचार करणारांसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. जे काही आहे ते सारे ‘ आज ‘ मध्येच दडलेले आहे. अर्जुनाला त्याप्रमाणे फक्त पक्ष्याचा डोळाच दिसत होता, तसा आपल्याला फक्त ‘ आज ‘ दिसला पाहिजे.

आज जीवनातील प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस
आज जीवनातील प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस

आजचा दिवस म्हणजे एक असा दिवस, ज्यात आपल्या हाती आहेत १६ तास, जागृतावस्थेतील १६ तास ज्यात आपण किती तरी कार्य करू शकता. उंचावर पोहोचण्यासाठी एक एक पायरी चढत जावे लागते;
तसेच जीवनातील प्रगतीसाठी प्रत्येकाने आजचा उपयोग केला पाहिजे. आजला उद्याच्या हवाली करता कामा नये. सकाळी उठल्यावर म्हणा, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे .
तो मला माझी क्षमता सिद्ध करण्यासाठी परमेश्वराने दिला आहे. आज संधी येईल व मी संधीचे सोने करीन.
दिवस तर हातातून रेती निसटून जावी. तसे जात असतात जर माणसाचे आयुष्य ८० वर्षाचे असेल, तर त्याच्या हाती फक्त २९,२०० दिवस येतात. तेव्हा सर्व अडचणी, संकटे इत्यादींना मागे सारत
आजचा दिवस सफल करण्याचा निश्चय करा. कृती करा, तुम्ही आज सफल करा, आज तुमचा ‘ उद्या ‘ सफल करील, याबद्दल काही शंका करू नका.

 

जर आपणास कोणी प्रेमात धोका दिला असेल व तुम्ही दु: खी असाल तर Sad Status Marathi च्या सहाय्याने तुम्हीही आपल्या भावना शेअर करू शकता.  आपल्या दु: खी मनाच्या भावना Sad Status Marathi च्या सहाय्याने व्यक्त करा. 5000+ पेक्षा अधिक सैड स्टेटस मराठी चा संग्रह फक्त आपल्यासाठी.

Leave a Reply