हृदयरोग दूर ठेवण्यासाठी असा असावा आहार

आरोग्य ज्ञान, लाइफस्टाइल

आजच्या धावपळीच्या आणि तणावमुक्त जीवनात सर्वात वेगाने पसरणारा म्हणून हृदयरोगाचा पहिला क्रमांक लागेल. जर हृदयरोगांना  दूर ठेवायचे असेल तर आहाराबाबत पुढील गोष्टीकडे लक्ष द्या.
विशेषकरून सात्विक आहार घ्या. भाज्या- पालेभाज्यांचे प्रमाण भरपूर ठेवा. भोजन झाल्यानंतर विश्रांती घ्या.
 संपूर्ण शाकाहारी भोजन हृदयरोग निवारणात महत्त्वाची भूमिका बजावते. मोहरी, सोयाबीन, तीळ आदि तेलांचे प्रमाण  दिवसाला १० मिलीपेक्षा जास्त नसावे.

हृदयरोग दूर ठेवण्यासाठी असा असावा आहार
हृदयरोग दूर ठेवण्यासाठी असा असावा आहार

वर्ज्य आहार:
१) मांसाहार – सर्व प्रकारचे मांस, मासे, अंडी इत्यादी .
२) सर्व प्रकारचे डबाबंद खाद्यपदार्थ .
३) तूप, लोणी, तेल इत्यादी पदार्थ.
४) तळलेले, तेलकट पदार्थ.
५) मादक पदार्थ – सर्व प्रकारची मद्ये, हेरोइन.इत्यादी.
६) दुध , दही, पनीर इत्यादी दुधापासून बनवलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ काढलेले दुध, तक घ्यायला हरकत नाही.
उपयुक्त आहार :
 १) सर्व प्रकारच्या सालीसह डाळी ( ज्या डाळीपासून गॅस बनतो, त्या वगळून )
२) सर्व प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या,
३) सर्व प्रकारची धान्ये – गहू, तांदूळ बिन पॉलिशचे चांगले.
४) सर्व प्रकारची फळे- पपई, कलिंगड, काळी द्राक्षे, आंबा, संत्री, डाळिंबे इत्यादींचा समावेश अधिक. रंगीत फळांचा समावेश प्रमाणात असावा. जर मधुमेह नसेल तर सर्व प्रकारची गोष फळे खायला हरकत नाही.
कमी प्रमाणात खायचे पदार्थ
मीठ, साखर( मधुमेह नसला तरीही प्रमाण कमीच ठेवावे) आंबट पदार्थ, मसालेदार पदार्थ, स्निग्ध पदार्थ काढून घेतलेल्या दुधाचे प्रमाणदेखील मर्यादित ठेवावे.

Leave a Reply