आहे त्याचा आनंद घ्या आणि चिंतामुक्त राहा

अभाव हा आपल्याला संघर्षाची प्रेरणा देतो, काही मिळविण्यास प्रवृत्त करतो, हि चांगली गोष्ट आहे; पण अभावाने बेचैन होणे, तणावग्रस्त होणे हि पूर्णत:चुकीची गोष्ट आहे.
जे आहे, त्याचा उपभोग घ्या, आनंद मिळवा आणि जे नाही, अशी संताची शिकवण आहे. मात्र आम्ही उलट, जे नाही त्याचे दु:ख करत आहे, त्याचा आनंदही गमावून बसतो.
आपल्या इच्छाआकांक्षांची पूर्ती करण्यासाठी जग नुसते सुसाट धावत आहे.

आहे त्याचा आनंद घ्या आणि चिंतामुक्त राहा
आहे त्याचा आनंद घ्या आणि चिंतामुक्त राहा

जे आहे त्याचा आनंद घ्या आणि जे नाही त्याच्या विचाराने तणावग्रस्त होऊ नका या शिकवणीच्या अगदी उलट वागत आपण जे आपल्याजवळ आहे, त्याचा आनंद घेण्यासही मुकतो.
भगवान श्री रामचंद्राचा राज्याभिषेक होणार होता; परंतु त्यांना वनवास स्वीकारावा लागला. वनवासात त्यांच्याकडे सर अभावच होता.
उलट रावणाकडे सर्व देवही शरण यावेत अशी सत्ता होती. तरीही रावणाचा पराभव व रामाचा विजय झाला.
 एकाकडे सारे काही असूनही त्याचा पराभव झाला , तर एकाकडे काहीच नसूनही त्याचा विजय झाला.
अभाव हा आपल्याला संघर्षाची प्रेरणा देतो, काही मिळविण्यास प्रवृत्त करतो, हि चांगली गोष्ट आहे; पण अभावाने बेचैन होणे, तणावग्रस्त होणे हि पूर्णत: चुकीची गोष्ट आहे. लोक आंतरिक अभावही भरण्याचा प्रयत्न करतात.
 रावणाने भक्तीचा अभाव अहंकाराने भरण्याचा प्रयत्न केला. लोक आपल्या  अंतस्थ अभाव विकृती / दुर्गुण यांनी भरण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना भक्ती करायची आहे, त्यांनी अभावाचाही आनंद घेणे शिकावे.

Leave a Reply