लग्नापूर्वी आणि लग्नानंतर घ्यायची काळजी

लग्नापूर्वी आणि लग्नानंतर घ्यायची काळजी
मनुष्याच्या जीवनात लग्नापूर्वीचा काळ आणि लग्नानंतरचा काळ असे दोन टप्पे येतात. या दोन्ही काळामध्ये आपले आचरण, वर्तन कसे असावे, हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. जेणेकरून लग्नापूर्वी हातून भविष्यात गोत्यात आणणारी कृती घडू नये व लग्नानंतरचे भावी वैवाहिक जीवन आनंदात जावो.


लग्नापूर्वी- लग्नापूर्वी शरीरसंबंध न अनुभवाने हे मागासलेपणाचे लक्षण आहे, असे काही मुली मानतात; पण ते योग्य नव्हे. आपल्या समाजात मुक्त शरीर संबंधाला मान्यता नाही. ज्या समाजात मुक्तपणे शरीरसंबंध राखले जातात, त्या समाजात कुमारी मातृत्व, गुप्तरोग, एड्स यांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळते. तरुण मुले प्रेमाचे नाटक करतात आणि मुलींना गर्भावस्थेत लोटतात आणि नंतर हात वर करून मोकळे होतात.

अशावेळी ती मुलगी फसलेली असते; परंतु हि वेळ येण्यापूर्वीच तिने अगोदरच सावध असणे शहाणपणाचे ठरते. यासाठी लग्नापूर्वी परपुरुषाशी संबंध प्रस्थापित करताना विशेष काळजी घेणे महत्वाचे ठरते.
लग्नानंतर- लग्नानंतर आपल्या जोडीदाराला ‘तुझं पूर्वी कोणावर प्रेम होतं का?’ असा प्रश्न विचारू नये. कारण या प्रश्नाने उभयतांत अविश्वासाची दरी निर्माण होऊ शकते. पौगंडावस्थेत भिन्न लिंगाविषयी आकर्षण निर्माण होणे, स्वाभाविक असते. जोडीदार आता तुमच्याशी एकनिष्ठ व प्रामाणिक असेल, तर मागचे उकरून काढण्यात काहीच अर्थ नसतो.

Leave a Reply