पावसाळ्यात मेकअप कसा ? पावसाने खराब होऊ नये असा

सौंदर्य

एखादी चांगली गोष्टही चुकीच्या वेळी केली ,तर तिचा चांगुलपणा वाया जातो हे तर सत्य आहे आणि पावसाळ्यातील मेकअपला हे लागू आहे. त्यासाठी काही टिप्स :

पावसाळ्यात मेकअप कसा ? पावसाने खराब होऊ नये असा
पावसाळ्यात मेकअप कसा ? पावसाने खराब होऊ नये असा
  • ताजा मेकअप करून घराबाहेर पडू नये. फेस पावडरचा उपयोग तर स्नानानंतर लगेच करावा.
  • डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्यासाठी काजळ- मस्करा वापरात असाल , तर तो पावसात दोन चार थेंबांनी बिघडून जाईल . तेव्हा  वॉटरप्रूफ आयलायनरचा वापर करा वा लाईट बरो पेन्सिलचा.
  • ब्लशरचा  वापर करत असाल तर पावडर ब्लशरऐवजी  क्रीमी  ब्लशरचा  वापर करा.
  • लिपस्टिक फार गडद करू नये. ओठांवर लिपस्टिकचा एकाच ‘ कोट ‘ द्यावा. त्याने स्वाभाविक लालिमा दिसेल आणि पाण्यात विरघळणारही नाही.
  • झोपताना ओठांना हलकीशी कोल्ड क्रीम लावावी. त्याने ओठ मुलायम राहतील.
  • स्नानापूर्वी चेहरा, मान, हात यांना दुधाने मालिश करावे. याने त्वचा स्निग्ध राहील .

Leave a Reply