रमजानची जकात वाटताना यमनच्या राजधानीत मोठी चेंगराचेंगरी; चेंगराचेंगरीत ८५ नागरिकांचा मृत्यू, जकात म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय

आजची सकाळ रमजान (Ramadan 2023) उत्साहावर विरजण घालणारी बातमी यमनमधून समोर येत आहे. यमनची राजधानी साना येथे रमजान निम्मित श्रीमंत व्यापाऱ्यांच्या जकात वाटण्याच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८० ते ८५ नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. साना येथील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार यमनमध्ये झलेल्या दुर्घटनेत ८० ते ८५ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३२२ नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समवेश आहे.

जकात म्हणून प्रत्येक व्यक्तीला १५०० रुपये मिळणार होते

रमजानमध्ये जकात घेण्यासाठी यमनची राजधानी साना झालेल्या गर्दीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. यात चेंगराचेंगरीत जवळपास ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील १३ जणांची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जकात म्हणून इथे प्रत्येक व्यक्तीला १५०० रुपये मिळणार होते, हेच घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. पण या उत्सवाचा बेरंग होऊन नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

yemen ramadan zakat

अधिकृत माध्यमांनी घटनेची माहिती प्रसारित केली

यमनमधील इराण-समर्थित हूती चळवळीद्वारे चालवल्या जाणार्‍या मुख्य टेलिव्हिजन न्यूज आउटलेट अल मसिराह टीव्हीने सना येथील आरोग्य संचालकांचा हवाला देऊन सांगितले की मृतांव्यतिरिक्त अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी १३ जणांची प्रकृती गंभीर आहे.

हूती-नियंत्रित अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे, की मुस्लीम पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसांत व्यापाऱ्यांकडून जकात वाटप केली जात होती. याचवेळी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. प्रवक्त्याने या घटनेचे वर्णन ‘दुःखद’ असे केले.

काय असते जकात?

जकात हे एक प्रकारचे दान आहे. प्रत्येक सक्षम मुस्लिमाने त्याच्या एकूण जमा संपत्तीपैकी २.५ टक्के रक्कम दरवर्षी गरिबांना जकात म्हणून वितरित करणे बंधनकारक आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सने बचाव कार्यात सहभागी असलेल्या दोन प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, या जकातसाठी एका शाळेत शेकडो लोक जमले होते. येथे प्रत्येक व्यक्तीला ५ हजार यमनी रियाल किंवा भारतीय चलनात सुमारे १५०० रुपये मिळणार होते. जकात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जबाबदार असलेल्या दोन व्यावसायिकांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही आंतरिक मंत्रालयाने एका वेगळ्या निवेदनात म्हटले आहे. मृतांची संख्या अजून वाढू शकते.

हे हि वाचा : समोसा हा भारतीय नाही तर विदेशी खाद्यपदार्थ आहे; मग भारतात समोसा कोणी आणला? वाचा रंजक माहिती..

Follow Us on Facebook