विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ असताना येतोय तणाव; मग तणाव दूर करण्यासाठी महत्वाच्या टिप्स..
दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. अशा परिस्थिती विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव असणे सामान्य आहे. परंतु तो ताणतणाव जास्त वाढल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित व्हावा यासाठी विद्यार्थी खूप वेळापासून मेहनत घेऊन अभ्यास करत असतात. त्यामध्ये शाळा कॉलेज मध्ये शिकवलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे टेन्शन विद्यार्थ्यांना असणार हे स्वाभाविक आहे. मात्र काही सोप्या टिप्स मुळे विद्यार्थ्यांची ही तणावग्रस्त मानसिकता आपण बदलू शकतो. ताणतणाव न घेता विद्यार्थी चांगला अभ्यास करू शकतात.
विद्यार्थ्यांनीं सर्वप्रथम अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे
विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम तुमच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवा, विद्यार्थी परीक्षेच्या भीतीपोटी बहुतेक वेळा विद्यार्थी खूप वेळ अभ्यास करतात. मात्र यामुळे तणाव वाढू शकतो. त्यामुळे प्रत्येक विषयाच्या अभ्यासात अंतर ठेऊन अभ्यास करा. प्रत्येक विषयासाठी एक दिवस द्या किंवा दिवसाला दोन विषयाचा अभ्यास करा, यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता कमी असते.
विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम अभ्यासासाठी मोकळी आणि शांत जागा निवडा
अभ्यासासाठी अशी जागा निवडा जिथे चांगला प्रकाश, मोकळी हवा आणि शांतता आहे. या गोष्टींशिवाय कोणालाही अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे फार कठीण आहे. वाचताना मोबाईल दूर ठेवा. अभ्यास करत असताना मोबाईलचा वापर करून नका. फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
अभ्यास करताना वेळोवेळी ब्रेक घ्या
प्रत्येकाची वाचण्याची पद्धत वेगळी असते. जर कोणी मध्ये ब्रेक घेऊन वाचले तर त्याला लक्ष केंद्रित करणे आणि वाचलेले सर्व लक्षात ठेवणे सोपे जाते. अभ्यासात ब्रेक घेतल्यानेही मेंदू फ्रेश राहतो. याशिवाय तुम्ही आपले डोळे बंद करा आणि काही वेळ झोपा किंवा चालत जा किंवा आपण एखाद्याशी सकारात्मक बोलू शकता. त्यानंतर पुन्हा अभ्यास केलेले उजळणी करा याने तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या लक्षात आहे कि नाही हे देखील कळेल.
विदयार्थ्यांनी निरोगी आहार घ्यावा
परीक्षा चालू होण्याअगोदर किंवा चालू असताना तुमच्या आरोग्याला हानी पोहोचेल असे काहीही खाऊ नका. त्यामुळे गॅस, अँसिडिटी, झोप, थकवा किंवा तब्येतही बिघडू शकते. त्यामुळे तुमच्या अभ्यासातही अडथळा येतो. शक्य तितके निरोगी अन्न खा, स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी अडीच ते ३ लिटर पाणी प्या.
विद्यार्थ्यांनी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चांगली झोप
विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यासाठी किमान ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. जिथे काही विद्यार्थ्यांना रात्री अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येते, तर काहींसाठी सकाळची वेळ चांगली असते. याशिवाय लक्ष केंद्रित करण्यासाठी मन शांत असणे खूप महत्वाचे आहे. ज्यामध्ये झोप खूप उपयुक्त आहे. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून अभ्यास करणे जास्त फायदेशीर ठरते.
अभ्यासाविषयी नोट्स उपयोगी येतील
तुम्ही ज्या विषयाचे वाचन करत आहात, ते वाचताना छोट्या नोट्स बनवल्याने गोष्टी वाचणे आणि लक्षात ठेवणे खूप सोपे होते. तुमच्या महत्त्वाच्या विषयांच्या नोट्स तयार करा. कोणताही लेसन सर्व करण्याचा राहिला असेल तर तो नोट्सद्वारे कव्हर केला जाईल. त्यामुळे नोट्स बनवा आणि त्यानुसार अभ्यास करा.
भिजलेले बदाम खाणे स्मरणशक्तीसाठी जास्त फायदेशीर
विद्यार्थ्यांनी घरी रात्री २ ते ४ बदाम रोज पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यावर खावेत त्यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली होत जाईल.