Ration Card Update : आता राशन कार्ड धारकांना प्रत्येकी धान्य ऐवजी मिळणार 9 हजार रुपये.

भारत

Ration Card Update : जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल आणि तुम्हाला देखील मोफत रेशन योजनेचा लाभ मिळत असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. कारण सरकारने रेशन कार्डधारकांना प्रत्येक माणूस धान्य ऐवजी मिळणार 9 हजार रुपये.

५९ हजार ते १ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याची योजना सुरु केली होती परंतु ती बंद करण्यात आल्याने लाभार्थीना जुलै २०२२ पासून गव्हाचे तर सप्टेंबर २०२२ पासून तांदळाचे वाटप बंद करण्यात आले होते.

ration card update

काय आहे योजना

Ration Card Update : एका व्यक्तीला वर्षाकाठी ९ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

“या” नागरिकांना राशन धान्य ऐवजी लाभार्थीच्या बँक खात्यात थेट मिळणार 9 हजार रुपये

कसे मिळतील पैसे?
कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्यात येतील. लाभ मिळण्यासाठी आधार सलंग्न असणे अनिवार्य असेल. ४ जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी ३६ हजार रुपये मिळतील. या कुटुंबाना या पैश्यातून बाजारामधून गहू, तांदळाची खरेदी करता येईल. गरज भागून वाचलेला पैसा अन्य गरजा भागवण्यासाठीही वापरता येईल.