वीज कंपनीची जबरदस्त ऑफर! फक्त १ तास अंधारात बसा आणि पैसे मिळवा..

भारत

सध्या जगभरात बदललेले हवामान, वाढणारी लोकसंख्या यामुळे प्रत्येक देशात काहीतरी समस्या निर्माण होताना दिसत आहेत, जसे कि सध्या पाकिस्तान देशात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक निर्माण केला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव जनसामान्यांच्या खिशाला न परवडणारे झाले आहे, तसेच पाकिस्तान मध्ये आर्थिक दिवाळखोरीमुळे वीज बंद करण्याची वेळ आलेली असताना, ब्रिटनच्या नॅशनल ग्रिडने देशात वीजबचतीसाठी एक अनोखी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत दिवसातला कमीतकमी १ तास जरी ग्राहक विजेशिवाय राहू शकले, तर त्यांना पैशाच्या स्वरूपात मोबदला देण्यात येईल. नागरिकांना विजेचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्याचा वापर मर्यादित करण्यासाठी ब्रिटनमध्ये ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे.

Great offer of the electricity company

पाणी, इंधन आणि वीज याचा वापर व्यवस्थित होण्यासाठी नवीन योजना

जगभरात प्रत्येक देशात पाणी, इंधन, वीज या गोष्टींचा अमर्याद वापर रोखण्यासाठी योजना आखायला सुरुवात केली आहे. जगात प्रत्येक देशात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्या आणि त्यासाठी पुरेल इतके पाणी, इंधन भविष्यात उपलब्ध होईल का याबाबत संशोधक साशंक आहेत. त्यामुळेच आहे तो साठा मर्यादित स्वरूपात आतापासून वापरला तर आपल्या पुढच्या पिढीला सुख, समाधानाने जगता येऊ शकेल. त्यासाठी अशा योजना आखाव्या लागतात. ‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, या योजनेमध्ये सहभाग घेणाऱ्या ग्राहकाने १ तास वीज बंद ठेवली, तर त्या बदल्यात त्या ग्राहकाला हजारो रुपये मिळू शकतात. डिमांड फ्लेक्झिबिलिटी सर्व्हिसच्या अंतर्गत ग्राहकांना ही सवलत दिली जाते आहे. ब्रिटनमध्ये राहणे सध्या खूप महाग झाले आहे. तिथेही महागाई वाढली असल्याने नॅशनल ग्रिड कंपनीने डिमांड फ्लेक्झिबिलिटी सर्व्हिसचा लाइव्ह इव्हेंट चालू केला आहे.

नवीन योजनेचा नेमका उद्देश काय आहे?

देशातील नागरिकांना विजेचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे नॅशनल ग्रिड म्हटले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्यांना बचत करण्याचा चांगला फायदाही मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांना केवळ विजेच्या सर्वाधिक वापराच्या काळात निश्चित वेळासाठी वीज बंद ठेवावी लागणार आहे. तसे केल्याने मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होईल व ग्राहकांना काही पैशांच्या स्वरूपात मोबदलाही मिळेल.

योजनेची सर्व माहिती नॅशनल ग्रिड ईएसओच्या वेबसाइटवर

नॅशनल ग्रिड ईएसओच्या https://www.nationalgrideso.com/ या वेबसाइटवर त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘तुम्ही डीएफएसच्या योजनेत भाग घेतला असेल, तर तुमचा वीज विक्रेता डेमॉन्स्ट्रेशन टेस्ट किंवा लाइव्ह इव्हेंटच्या आधी तुमच्याशी संपर्क साधेल. तो तुम्हाला त्या दिवशीच्या प्रत्यक्ष सहभागाबद्दल विचारणा करेल असे त्यामध्ये म्हटले गेले आहे. यावर्षीच्या हिवाळ्यात आम्हाला डिमांड फ्लेक्झिबिलिटी सर्व्हिस योजना वापरण्याची परवानगी मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे,’ असे ईएसओच्या कार्यकारी संचालकांनी म्हटल्याचे वृत्त आज तकने दिले आहे.

ब्रिटन देशात नागरिकांमध्ये विजेच्या मर्यादित वापराबाबत जनजागृती व्हावी, देशातला विजेचा वापर नियंत्रित व्हावा, यासाठी ब्रिटनमध्ये हि नवीन योजना राबवण्यात येत आहे. नागरिकांनी निश्चित काळासाठी वीज बंद ठेवली, तर त्याचा योग्य मोबदलाही त्यांना दिला जाणार आहे. असे केल्यास मोठ्या प्रमाणात वीज वाचेल तसेच इतर देशही अशी योजना भविष्यात आखून अंमलबजावणी करतील.