पेट्रोल पंपावर तुम्हाला या ६ सुविधा मिळतात मोफत! तुम्हाला या सुविधा माहिती आहेत का?

भारत

सध्या सर्वच ठिकाणी वाहुतकीसाठी, प्रवासासाठी खाजगी तसेच इतर गाड्यांचा वापर केला जात असतो. गाड्या वापरणाऱ्या नागरिकांना अनेकदा गाडीत पेट्रोल (Petrol) किंवा डिझेल (Diesel) भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जावे लागते. पण किती जणांना माहित आहे की तुम्हाला पेट्रोल पंपावर काही सुविधा मोफत (Free Facilities) मिळतात त्याचा तुम्ही लाभ घेता का? तुम्ही पंपावरून इंधन घेतले किंवा नाही घेतले, तरीही तुम्ही या मोफत सुविधांचा लाभ मिळवू शकता. कोणत्याही पेट्रोल पंपाला परवाना (License) मिळण्यापूर्वी त्यांना त्यांच्या जागी या ६ मोफत सुविधांची व्यवस्था करावी लागते. जर तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून या सुविधा मिळत नसतील तर तुम्ही पेट्रोल पंपाविरोधात तक्रारही दाखल (Complaint) करू शकता. त्यामुळे जाणून घेऊया या मोफत सुविधांबद्दल..

petrol pump

प्रथमोपचार पेटी(First-aid Kit)

प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रथमोपचार पेटी (First-aid Kit) ठेवणे बंधनकारक आहे, ज्यामध्ये पट्टी, मलम तसेच पेनकिलर, पॅरासिटामॉल उपलब्ध असते, जे तुम्ही आपत्कालीन (Emergency) परिस्थितीत मोफत वापरू शकता. त्यामुळे प्रवास करताना जर जखम झाल्यास याचा लाभ तुम्ही कोणत्याही जवळपास असणाऱ्या पेट्रोल पंपावर घेऊ शकता.

पिण्याचे पाणी (Drinking Water)

पेट्रोल पंपावर तुम्ही स्वच्छ पिण्याचे पाणी (Mineral Water) मोफत पिऊ शकता. पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी ही एक अत्यावश्यक अट आहे. त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ठेवणे बंधनकारक असते.

मोफत हवा (Free Air)

तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपावर टायरमध्ये मोफत हवा भरू शकता. यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. हवा भरण्यासाठी पंप व्यवस्थापकाने कर्मचारी नियुक्त करणे देखील बंधनकारक आहे.

शौचालय सुविधा (Toilet Facility)

प्रत्येक पेट्रोल पंपावर महिला, पुरुष आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. नागरिकांना शौचालय वापरण्यासाठी पंपावरून इंधन घेणे बंधनकारक नाही. या सुविधेचा लाभ तुम्हाला मोफत मिळतो.

फोन सुविधा (Calling Facility)

प्रवास करत असताना जर तुम्ही आपात्कालीन (Emergency) परिस्थितीत अडकले असाल तर तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत फोन कॉल सुविधेचा लाभ घेऊ शकता आणि कॉल करून पोलीस किंवा कुटुंबीयांशी संपर्क साधू शकता. पेट्रोल पंपावर तुम्हाला लँडलाईन आणि मोबाईल फोन दोन्ही मिळू शकतात. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत तुम्ही या सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.

हे हि वाचा : व्हॉट्सअँपने युजर्ससाठी आणले झक्कास फिचर, आता १ अकाऊंट ४ मोबाईलमध्ये वापरता येणार!

Follow Us on Facebook