८ वर्षांपासून आसाराम बापू जेलमध्ये, मग १० हजार कोटींचे साम्राज्य कोणाच्या नियंत्रणात?

भारत

गुजरातमधील स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना नुकताच गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा २०१३ मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. त्यामुळे गांधीनगर कोर्टाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, आसाराम बापूचे साम्राज्य किती मोठे आहे, हे तुम्हाला माहितीही नसेल तर जाणून घेऊया आसाराम बापूचे साम्रज्य कोणाच्या नियंत्रणात आहे.

१० हजार कोटीपेक्षा जास्त संपत्ती

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंचे साम्राज्य ४०० हून अधिक आश्रम, हजारो हून अधिक सेवा समित्या, १५ हजार हून अधिक बालसंस्कार केंद्रे, ४० हून अधिक गुरुकुल – धार्मिक हे सर्व साम्राज्य १० हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. हे सर्व एक ट्रस्ट या मालमत्तेची देखरेख करतो आणि त्यांच्या सर्व कामाचे व्यवस्थापन करतो. पण मग या ट्रस्टचे नेतृत्व कोण करत आहे? हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल.

आसाराम बापूंच्या देशभर पसरलेल्या आश्रमांचे प्रमुख म्हणून आता कोण काम करत आहे?

तुरुंगांत असलेले आसाराम बापू तसेच त्यांचा मुलगा नारायण साई हे काम करत नाहीत. ही जबाबदारी आता आसाराम बापूंची कन्या भारतश्री पार पाडत आहे. संत श्री आसारामजी ट्रस्ट ही सेवाभावी संस्था असून तिचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. भारती आता या ट्रस्टच्या मुख्यालयातून सर्व दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करते. भारतीश्रीसोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या फक्त खूप प्रवास करत नाही, तर देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या आश्रमांचे दैनंदिन कामकाज आणि आर्थिक व्यवहारही नियंत्रित करतात. पण त्या आसाराम बापूंप्रमाणे वेगवेगळ्या शहरात जाऊन प्रवचनसारखा कोणताही कार्यक्रम करत नाहीत. आश्रमाव्यतिरिक्त त्या प्रसिद्धी माध्यमांपासूनही दूर राहून हे सर्व मोठे साम्राज्य सांभाळतात.

आसाराम बापू जेल मध्ये गेल्यानंतर ०८ वर्षांपासून आश्रम सांभाळत आहेत भारती

आसाराम बापूने अहमदाबादमध्ये पहिला आश्रम स्थापन केला. भारती यांचा जन्म १९७४ मध्ये झाला. २०१३ मध्ये बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला अटक झाली तेव्हा भारती आणि आसारामची पत्नी लक्ष्मी देवी यांनाही अटक करण्यात आली होती. पण नंतर त्यांची सुटका करण्यात आली. पण मागील ८ वर्षांत भारतीची या संत श्री आसारामजी ट्रस्ट ही सेवाभावी संस्थावर पकड खूप मजबूत झाली आहे, असे सांगितले जाते. कारण आता हे जवळपास स्पष्ट झाले आहे की, १ वर्षात ना आसारामचे तुरुंगातून बाहेर येणे सोपे आहे आणि ना त्यांचा मुलगा नारायण साईचे. या दोघांशिवायही आसाराम बापूंचे धार्मिक साम्राज्य सामान्यपणे सुरू आहे. भक्तांची संख्या आणि देणगी कमी झाली असली, तरी आसाराम बापूच्या भक्तांचे मत आहे की, त्याला जाणीवपूर्वक अडकवण्यात आले आहे.

४८ वर्षीय भारती हि वडिलांसारखे राहणीमान तर महागड्या कार वापरते

४८ वर्षीय भारती नाटकीय पद्धतीने प्रवचन देतात. नाचते, गाते. तिचे वडील आसाराम बापू जसे करायचे तसे ती स्वतःला फुलांनी सजवते. भारत महागड्या कार वापरते. अहमदाबादमधील आसाराम बापू यांच्या आश्रमाच्या आवारात प्रवचन आणि आरतीला उपस्थित राहते. त्यांच्याभोवती भक्तांची गर्दी असते. आश्रमातील आरती संबंधित उपक्रम दररोज YouTube वर अपलोड केले जातात.

भारत वडिलांसारखीच गर्दी जमवते

गर्दी जमवण्यात मोठे संत जे काही करतात ते भारतश्री करते. ती हात वर करून गर्दीला आनंद देण्याचा प्रयत्न करते. ती स्वतः प्रवचनाच्या आधी संगीतामध्ये गाते. मग ती भक्ती भावाने परिपक्वतेने प्रचार करते. प्रवचन देताना, ती एक अनुभवी प्रचारक असल्याचे दिसते. आसाराम बापूच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार, भारतीचे प्रवचन अतिशय मंत्रमुग्ध करणारे आहे.

भारतीचा विवाह १९९७ मध्ये डॉ. हेमंत यांच्याशी झाला होता. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. नंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर भारती आपल्या वडिलांच्या साम्राज्यात महिला आश्रमांचे काम पाहू लागली. यासोबतच ती प्रवचनही देऊ लागली.

भारतीने १२ व्या वर्षी दीक्षा आणि १४ वर्ष ध्यान व योगासने केली

आसाराम बापूंनी ७० च्या दशकात आध्यात्मिक साम्राज्य निर्माण केले होते. त्यानंतर त्याचा मुलगा नारायण साई आसारामच्या भक्तीचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आला. ते पुरेसे नव्हते. लवकरच भारतीही त्यामध्ये सामील झाली. १५ डिसेंबर १९७४ रोजी जन्मलेल्या भारतीने वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी दीक्षा घेतली. त्यानंतर १४ वर्षे ध्यान आणि योगासने केली. तिने एम.कॉम पर्यंत शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. भारतीने तिच्या वडिलांचे साम्राज्य गेली ८ वर्ष कणखरपणे सांभाळत आहे.

भारतीवर झाले होते आश्रमातील मुलींना आसाराम बापूकडे पाठवण्याचा आरोप

आसारामच्या सांगण्यावरुन, जो आश्रमातील मुलींना त्याच्याकडे पाठवत असे ती व्यक्ती भारती हीच होती, असा आरोपही तिच्यावर लावण्यात आला आहे. आश्रमात काम करणाऱ्या अमृत ​​प्रजापती या माजी साधकाने आसाराम बापू भारतीला फोन करायचे असा आरोप केला होता. ती मुलींना गाडीतून आणायची. मात्र, भारती यांनी नेहमीच हे आरोप फेटाळून लावले. आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई सध्या जेल मध्येच आहेत पण हे सर्व साम्राज्य भारती चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे.