अशी करा कढीपत्त्याची ओली चटणी

पाककला

कढीपत्त्याची ओल्या चटणीचे साहित्य व कृती
साहित्य :-

  • कढीपत्ता पाने एक मोठी वाटी
  • चणाडाळ पाव वाटी
  • उडीद डाळ मुठभर
  • ओलं खोबरं २ चमचे
  • चिंच सुपारी एवढी
  • लाल सुक्या मिरच्या २
  • जीरे लहान अर्धा चमचा
  • मीठ चविनूसार
  • पाणी गरजेनुसार

कृती :-
प्रथम कढीपत्ता स्वच्छ धुवून टाँवेलवर पसरून कोरडा करावा.

आता गँसवर कढई ठेवून चणाडाळ, उडीद डाळ वेगवेगळी तांबूस भाजावी.

नंतर कढईत चमचाभर तेल घालून लाल मिरची, कढीपत्ता पाने व जीरे,चिंच भाजून घ्यावे.

भाजलेले पदार्थ थंड झाल्यानंतर भाजके पदार्थ व ओले खोबरे, मीठ घालून सर्व साहित्य मिक्सरमधे वाटावे. वाटताना गरजेनुसार थोडे पाणी घालावे. थोडी घटसरच ठेवावी.

आता वाटलेली चटणी काचेच्या सटात काढून वरून मोहरी, हींग -जीरे व कढीपत्ता घालून केलेली तेलाची थंड फोडणी घालावी.

अशी ही चटकदार चटणी जेवणात रूची आणते भाकरी, पोळी किवा वरण-भातासोबत सुध्दा मधे मधे चाखायला मस्तच लागते. तसेच कोणत्याही पराठे पुरी सोबत ही खाता येते.

हे ही वाचा : Marriage Anniversary Wishes in Marathi