सुखी व निरामय जीवनासाठी उपयुक्त वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र

दिशा दिग्दर्शन व ओरिएटेशन  हा वास्तुशास्त्रातील महत्त्वाचा नियम मानला जातो. सर्वसामन्यपणे  शास्त्रोक्त दिशा निर्धारणामुळे हवा, पाऊस, तापमान व आद्रतेमुळे प्राप्त होणार्‍या लाभाचा घरातील सदस्यांना जास्तीत जास्त लाभ घेत येतो, तसेच कडक ऊन, जास्त उष्ण वा थंड हवेपासून बचावही शक्य होतो. दिशा दिग्दर्शनाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे घराचे दरवाजे , खिडक्या व प्रकाशसज्जे  कसे असावेत या विषयीचे मार्गदर्शन . यामुळे घरातील व्यक्तींना ऊन, हवा व पाऊस यांचा जास्तीत जास्त लाभ होऊन सुरक्षितता उपलब्ध होते. या दृष्टीने वास्तुशास्त्रातील खालील नियम महत्त्वाचे ठरतात.

सुखी व निरामय जीवनासाठी उपयुक्त वास्तुशास्त्र
सुखी व निरामय जीवनासाठी उपयुक्त वास्तुशास्त्र

१) घराच्या लांब भिंती या उत्तरदक्षिण ठेवाव्यात व लहान भिंती पूर्व पश्चिम बाजूला ठेवाव्यात. त्यामुळे घराच्या भिंतींचे कमीत कमी बाह्य क्षेत्रफळ सुर्यकिरनांच्या बाजूला  उपलब्ध राहील.
२) जर जागा उपलब्ध असेल तर उन्हाच्या दिशेला झाडे लावून उष्णतेपासून सुटका करून घेणे शक्य होते.
३) दक्षिण -पूर्व  वा दक्षिण- पश्चिम या दिशांकडे जर मोकळी जागा सोडली गेली तर हिवाळ्यातही घर उबदार राहू शकते.
४) उष्ण प्रदेशांमध्ये दक्षिण दिशेला व्हरांडा ठेवावा. कारण उत्तर दिशेला तसाही कमीच सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे त्या दिशेला व्हरांडा बनवून फायदा नसतो.
५) पाऊस येण्याच्या दिशेला असणार्‍या घराचे दरवाजे, खिडक्या यावर छज्जे निर्माण करून घरातील जलप्रवेश रोखता येतो.
६) राहत्या खोल्या व बैठकीच्या जागा या दक्षिण- पूर्व, दक्षिण- पश्चिम व दक्षिण दिशेला असल्या पाहिजेत कारण थंडीमध्ये सुर्य दक्षिण दिशेला कमी उंचीवरून भ्रमण करतो. व असे केल्याने थंडीपासून बचाव करणे शक्य होते.
७) बेडरूमची जागा पश्चिम, दक्षिण-पश्चिम वा दक्षिण-पूर्व दिशेला निवडणे योग्य ठरते. कारण हवेचा प्रवाह या दिशांना अनुकूल असा वाहत असतो. याचबरोबर बेडरूमच्या पश्चिमी भिंतीच्या बाजूला झाडे लावून कडक उन्हापासून बचाव करणे शक्य होते.

हे ही वाचा : Gam Bhari Shayari

Leave a Reply