कधी व कसा दिवा लावल्याने धनप्राप्ती होते ?

  •  शास्त्रांनुसार देवदेवतांच्या  पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचा विधी मनाला जातो. तो दिवा लावण्याचा . दिव्याशिवाय कोणत्याही प्रकारची पूजा अपूर्ण मानली जाते.
  • ज्या प्रकारे एक दिवा अंध:कार नाहीसा करतो. त्याप्रमाणेच हा दिवा पूजेच्या वेळी आपल्या मनातील अंध:कार दूर करण्याचा संकेत मानला जातो.
  • घरातील देवघरामध्ये रोज सकाळी व संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो. त्यामुळे या घरावर सतत  दैवी कृपेचा वरदहस्त कायम राहतो.
  •  त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्यामुळे बरयाच प्रकारचे वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात. दिव्यातून निघणारा प्रकाश नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो व सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.
  • दिव्याच्या ज्योतीतून निघणारा धूर घराच्या वातावरणात असणारे सूक्ष्म रोगजंतू नष्ट करतो व आपले चांगले राहते.
  •  शास्त्रांनुसार दिवा लावण्याच्या संबंधी काही सामान्य नियम सांगितले गेले आहेत. त्या नियमांचे आपण सर्वांनी पालन करणे आवश्यक ठरते.
  • पूजा अर्चनेच्या  वेळी दिवा खाली न ठेवता तो अक्षता खाली ठेवून त्यावर दिवा ठेवावा.
  • रोज सूर्यास्तापर्यंत दिवा प्रज्वलित केल्याने लक्ष्मीमातेची कृपा होते.
  •  दिवा लावतेवेळी खालील मंत्र जप केल्याने घरात धनधान्य व समृद्धी कायम राहते व सर्व सदस्यांच्या उत्पन्नात भर पडते.
  • शुभं करोति कल्याणं आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धीविनाशाय च दीपज्योतीर्नमोस्तुते.

Leave a Reply