वास्तूसाठी सुखाचे तोडगे
- घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे.
- वास्तूच्या कोणत्याही भिंतीचा आधार घेऊन फुलांचे, शोभेचे अथवा भाजीपाल्याचे वेळ कधीही लावू नयेत.
- पिंपळाचे झाड घराच्या पश्चिमेला असणे श्रेष्ट फलदायी असते.
- घराभोवती नारळ, बेल, हिरडा, देवदार, प्लक्ष, चंदन, अशोक, पुन्नाग , चाफा चमेली आणि नागलता हि झाडे आवर्जून लावावीत .
- लवकर वाढणारी व भरपूर फळे देणारी पपई बहुतेक घरांच्या अंगणात लावली जाते; परंतु ती फलधारणा करणारी व दुध निघणारी असल्यामुळे वास्तूसाठी वर्ज्य मानावी. तिच्यामुळे संतती व संपत्तीचेही नुकसान होऊ शकते.
- प्लॉटमध्ये रुईचे झाड लावू नये. अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात व नंतर त्याचा दहनसंस्कार करतात. त्यामुळे धर्मशास्त्रात रुईचे झास वास्तुशेजारी असणे हा दोष मनाला गेला आहे.
हे ही वाचा : Friendship Shayari in Hindi