आपले ऑफिस बनवा सकारात्मक व समृद्ध

फेंगशुई
  • तुम्हाला जर आपल्या घराबरोबरच आपले ऑफिसही जास्त सकारात्मक व वाढत्या धनप्राप्तीचे साधन बनावे असे वाटत असेल तर फेंगशुईनुसार  खालील उपाय योजा.
 आपले ऑफिस बनवा सकारात्मक व समृद्ध
आपले ऑफिस बनवा सकारात्मक व समृद्ध
  • आपले जीवन निरोगी व निरामय होण्यासाठी केवळ घरच नव्हे तर ऑफिसमध्येही सकारात्मक ऊर्जेची नितांत  आवश्यकता असते.
  •  असे पाहावयास मिळते की सकारात्मक ऊर्जेच्या अभावामुळे ऑफिसमधील कोणी ना कोणी कर्मचारी कायम आजारी राहातो. याचा थेट परिणाम ऑफिसच्या  कार्यशैलीवर  पडत असतो.
  • अपेक्षेप्रमाणे  ऑफिसचे कामकाज होत नाही व त्यामुळे तणाव निर्माण होतो. हा तणाव आपल्याबरोबर आपण घरीही घेऊन येतो व तेथील वातावरणही त्यामुळे बिघडून जाते.
  • ऑफिसमध्ये  काम  करूनच आपण चरितार्थासाठी  व प्रगतीसाठी धनप्राप्ती साध्य करतो. पैसा अर्थात लक्ष्मीदेवतेला  साध्य करतो. पैसा अर्थात लक्ष्मीदेवतेला  आमंत्रित करण्याची दिशा ही दक्षिण- पूर्व आहे.
  • फेंगशुई  असे सांगते की, जर तुम्ही जास्त लाभ कमावू इच्छित असाल तर असा प्रयत्न करा की, तुमची केबिन व कॅशबॉक्स   ही नेहमी दक्षिण- पूर्व बाजूसच राहील.
  • या दिशेचा प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही येथे नाण्यांनी भरलेला लाल रंगाचा बाउल  ठेवा.
  • ऑफिसमधील तुमची बसण्याची जागा ही अशी असावी की, तुमचे तोंड दरवाजाकडे असावे. परंतु तुमची खुर्ची अशी लावावी की तुमची नजर दरवाजाबाहेर राहू नये. बाथरूम, टोयलेट, जिन्यासमोरही  तुमची बसण्याची जागा येऊ नये.

हे ही वाचा : Romantic Status in Hindi

Leave a Reply