वास्तुशास्त्रातील पंचतत्त्वाचे महत्त्व

फेंगशुई, वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रामध्ये पंचमहाभूतात्मक  तत्त्वांना ( पंचतत्त्वांना) कोणत्या प्रकारे संतुलित करावे याचे नियम देण्यात आले आहेत. त्याची माहिती संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे .
पृथ्वी तत्त्व – वास्तुशास्त्राप्रमाणे भूमी परीक्षण करून घरासाठी भूखंड निवडीसाठी फारच सखोल विचार करण्यात आला आहे. यात भूमी परीक्षा, मातीचे प्रकार, मातीचा सुगंध माती खोदताना कोणकोणत्या वस्तू आढळतात, मातीचा रंग या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. भूखंडाचा आकार, तो कोणत्या दिशेला आहे, पाण्याचा उतार कोणत्या दिशेला आहे. याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
जलतत्त्व- भूखंडामध्ये कोणत्या दिशेला स्वच्छ पाण्याचा स्त्रॊत असावा, वापरलेल्या व घाण पाण्याचा प्रवाह कोठून बाहेर काढायचा यासाठी नियम सांगण्यात आले आहेत.  

वास्तुशास्त्रातील पंचतत्त्वाचे महत्त्व
वास्तुशास्त्रातील पंचतत्त्वाचे महत्त्व

अग्नितत्त्व – वास्तुशास्त्रामध्ये भूखंडाचा व हल्लीच्या काळातील फ्लॅटचा दक्षिण- पूर्व भाग आग्नेय कोण मानला जातो. म्हणूनच याच भागात अग्नीसंबधित सर्व कार्य करणे व कार्यसाधने  ठेवणे उचित मानले गेले आहे.

उदा . किचन, भट्टी, बॉयलर इत्यादी. जर हे शक्य नसेल तर त्यासाठी उत्तर-पश्चिम कोण  पर्याय ठरतो .
वायू तत्त्व – घरामध्ये निरंतरपणे शुद्ध वायूचा प्रवाह खेळता राहाणे हि गोष्ट आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते. म्हणूनच वास्तुशास्त्राचा नियमानुसार घराचा पूर्व दिशेकडील भाग व उत्तर दिशेकडील भाग जास्तीत जास्त मोकळा ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळे प्रात:कालीन  सुर्य ऊर्जाव शुद्ध हवा आपल्याला सतत प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर उत्तरेकडून येणार्‍या वातावरणातील चुंबकीय तरंग लहरीही प्राप्त होत राहतात.
आकाशतत्त्व – घरामध्ये असणारे आंगण ( फ्लॅटमधील बाल्कनी ) हा भाग आकाशतत्त्वाची संबधित  आहे.
भूखंडाचा मध्य भाग हा ब्रह्मस्थान म्हणून ओळखला जातो व तोही खुला ठेवण्याचा प्रघात आहे.
यामुळेच प्राचीन वाड्यातील मध्यभागातील भाग मोकळा ठेवण्यात येत असे. यामुळे पूर्ण घरामध्ये क्रॉस व्हेनटीलेशन होते राहाते. त्यातून शुद्ध हवा मिळत राहते व अशुद्ध हवा बाहेर जाते.
मध्यभागात अंगण असणार्‍या घराची रचना हि पूर्व व उत्तर दिशेकडचा घराचा भाग खाली राहील तर दक्षिण व पश्चिम भागाकडील घराचा भाग उंच राहील अशी केली जाते. यामुळे दुपारनंतर सूर्याची किरणे जी आरोग्यासाठी अपायकारक मानली जातात. त्यापासून घरातील व्यक्तींचे संरक्षण होते.

हे ही वाचा : Dard Bhari Shayari

Leave a Reply